ETV Bharat / state

...अन् शेतकऱ्याने हातात कुऱ्हाड घेत बंद पाडले 'समृद्धी'चे काम

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे आसपासच्या शेतात धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्याचे काम बंद पाडले.

शेतकरी
शेतकरी
author img

By

Published : Jan 20, 2021, 8:55 PM IST

बुलडाणा - समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतात जात आहे. धुळीला कंटाळून मेहकर तालुक्यातील कल्याण शिवारातील संतप्त शेतकरी अनिरुद्ध तांगडे यांनी हातात कुऱ्हाड घेत बुधवारी (दि. 20 जानेवारी) दुपारी रस्त्याचे काम बंद पाडले. यावेळी शेतकऱ्याचे रौद्ररूप पाहून रस्ता तयार करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच कामावरील वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

धुळीमुळे शेतमजूर शेतात येत नाही

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील 36 किलीमोटरचा समृद्धी महामार्गाचे काम आपको कंपनी मार्फत सुरू आहे. या महामार्गाच्या खालच्या बाजूला रस्ता आहे. या ठिकाणाहून दिवसभर महामार्गाच्या कामावरील ट्रक ये-जा करत असतात. यामूळे रस्त्यालगतच्या शेतात मोठ्या प्रमाणात धुळ जात असते. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सध्या तूर, हरभरा, गहू संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा आहे. धुळीमुळे शेतामध्ये मजूर कामाला येत नाहीत. शेतकरी हा केवळ रस्त्याच्या धुळीला त्रस्त झालेला आहे.

नियमाप्रमाणे रस्त्यावर पाणी मारले जात नाही

कंपनीने नियमाप्रमाणे दिवसातून तीन वेळा या रस्त्याला पाणी मारले पाहिजे जेणेकरून धूळ उडणार नाही. पण, कंत्राटदार रस्त्यावर पाणीच मारत नसल्याने कंटाळून कल्याण या गावातील राहणारे शेतकरी अनिरुद्ध तांगडे यांनी चक्क हातामध्ये कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर उभे राहून बुधवारी दुपारपासून कामावरील संपूर्ण वाहतूक बंद केली आहे. संबंधित अधिकाऱ्याला बोलविल्याशिवाय वाहन पुढे जाऊ देणार नाही. मी कोणाच्या दारी जाऊन निवेदन देणार नाही सांगणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे आपको कंपनीच्या अधिकाऱ्यांची यावेळी तारांबळ उडाली आहे.

अन्यथा काम बंद पाडू

यावेळी शेतकरी तांगडे म्हणाले, नियमानुसार दिवसातून तीन वेळा पाणी फवारणी झाली नाही, तर शिवारातील सर्व शेतकरी एकत्र येऊन काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे.

कंत्राटदार नुकसान भरपाई देईल का ?

अधिकाऱ्यांना ढिसाळ नियोजनामुळे नियमाप्रमाणे रस्त्यावर पाणी मारले जात नाही. यामुळे धुळीचे प्रमाण वाढले असून शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. याची नुकसान भरपाई कंत्राटदार देतील का, असा प्रश्न तांगडे यांनी उपस्थित केला आहे.

धुळीमुळे पिकांच्या प्रकाश संश्लेषण व शोषण क्रिया होतात बाधित

शेतातील पिकाला धुळीमुळे प्रकाश संश्लेषण व शोषण क्रिया ह्या बाधित होतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते. शासनाच्या वतीने संपूर्ण महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांची पिकाची पाहणी करून सर्वे केलेला आहे. संपूर्ण अहवाल आम्ही शासनदरबारी मांडणार आहोत, अशी प्रतिक्रिया मेहकरच्या प्रभारी तालुका कृषी अधिकारी विजय सरोदे यांनी दिली.

हेही वाचा - वाढीव वीजबिल सवलतीबाबत निर्णय घ्या, अन्यथा...स्वाभिमानीचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.