बुलडाणा : शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू केलेले आंदोलन पोलिसांनी दाडपले आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत हे आंदोलन दडपून टाकले. त्यामुळे रविकांत तुपकर हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पोलीस कोठडीत मी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी बोलताना केली आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न : रविकांत तुपकर यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. तुपकर यांनी पोलिसाच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:वर पेट्रोल ओतून घेतले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. तसेच त्यांच्या आईदेखील घटनास्थळी उपस्थित होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर शेतकरी प्रकणावर आज आक्रमक झालेले पाहयला मिळाले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर यांनी पोलिसाच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:वर पेट्रोल ओतून घेतले. सध्या पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू आहे.
काय आहे कारण : रविकांत तुपकर यांनी कापूस, सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नांवर सरकारला १० फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. तुपकर यांनी पोलिसाच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. बुलढाणा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर आज हजारो शेतकरी जमा झाले आहेत. तुपकर गेल्या चार दिवसांपासून भूमिगत होते. पोलीस त्याचा शोध घेत होते. आज रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबईतील एआयसी पीक विमा कंपनी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
शेतकरी प्रश्नावर आक्रमक : विदर्भातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन करत आहे. मध्यंतरी मुंबईच्या जलसमाधी आंदोलनाची दखल सरकारने घेतली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकार,केंद्र सरकारकडून पाने पुसल्या गेली.
पोलीस बंदोबस्त वाढ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आज आक्रमक झाले. आज 11 फेब्रुवारी रोजी त्यांनी सरकारला आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यामुळे आज नेमके बुलढाणा किंवा मुंबईत रविकांत तुपकर आत्मदहन करतात की काय ? असा प्रश्न पोलीस यंत्रणेला पडला होता. यामुळे पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळाली. पोलिसांनी दोन दिवसांपासून रविकांत तुपकर यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवलेला होता.
तुपकारांनी दिल्या पोलिसांच्या हातवावर तुरी : गेल्या काही दिवसापासून पोलीस रविकांत तुपकरांचा शोध घेत होते. मात्र, तुपकारांनी याचा थांगपत्ता पोलिसांना लागु दिलेला नव्हता. गेल्या तीन दिवसापासून रविकांत तुपकर यांचा मोबाईल स्विच ऑफ देखील होता. आज अचानक ते पोलिसांच्या गणवेशात येत अंगावर अंगावर राकेल ओतून घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपासच्या परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आपण या आंदोलनाला थांबवणार नसून. या दडपशाहीला दबावाखाली आपण येणार नसून जोपर्यंत पूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा - Fiber Factory Fire Indore: इंदूरमधील फायबर कारखान्याला भीषण आग; 70 मजूर होते कामावर