ETV Bharat / state

बुलडाण्यात कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न - पणन महासंघ

पणन महासंघाच्यावतीने बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि सिंदखेडराजा येथील कापूस संकलन खरेदी केंद्रावर त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यासमोरच विष पिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

farmer-attempts-suicide-by-drinking-poison-in-buldana
बुलडाण्यात कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Dec 14, 2019, 7:55 PM IST

Updated : Dec 14, 2019, 8:38 PM IST

बुलडाणा - पणन महासंघाच्यावतीने बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि सिंदखेडराजा येथील कापूस संकलन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. मात्र, महासंघाच्या अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे या केंद्रांवर शेतकऱ्यांना 7 ते 8 दिवस थांबावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. आज (शनिवारी) कापूस खरेदी केंद्रावर त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क अधिकाऱ्यासमोरच विष पिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बुलडाण्यात कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

हेही वाचा - कांद्याचे दर चढेच राहिले तर रेस्टॉरंटमधील मेन्यू महागणार; हॉटेल संघटनेची भूमिका

जळगाव जामोद येथे पणन महासंघाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार शेतकरी आपल्या शेतातील कापूस ट्रक्टरच्या साहाय्याने खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभा आहे. 7 ते 8 दिवसांपासून एकाच ठिकाणी ट्रॅक्टर उभे असल्याने अवकाळी पावसाचा फटका कापसाला बसत आहे. त्यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होत असून कापूस मालाला योग्य भाव मिळणार नाही, अशी भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. शिवाय ट्रॅक्टरचे भाडे दिवसागणिक वाढत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

चिडलेल्या शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांना घेराव घालून आमचा कापूस खरेदी करा, अशी विनंती केली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना जुमानले नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या किशोर दाताळकर या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी शेतकऱ्याला वाचविले. काहींनी कापसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवून देण्याची धमकी दिली. यामुळे केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कापूस जलदगतीने खरेदी केला जाईल, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

हेही वाचा - परांड्यात वाळू माफियांचा धुमाकूळ; तहसीलदाराच्या अंगावर चढवला ट्रॅक्टर

Intro:Body:mh_bul_Farmers flock to the cotton shopping center,_10047

Story : पणन महासंघ कापूस खरेदी केंद्रावर शेतकरयांची हेळसांड़,
आठ दिवसांपासून शेतकरी कापूस घेऊन रांगेत उभा,
शासकीय नियमावलीला कंटाळून शेतकऱ्याचा विष प्राशन करुण आत्महत्येचा प्रयत्न.

बुलडाणा : पणन महासंघाच्यावतीने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि सिंदखेडराजा येथील कापूस संकलन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. मात्र पणन महासंघाचे अधिकायांच्याहेकेखोर वृत्तीमुळे या केंद्रांवर शेतकऱ्यांना आठ-आठ दिवस थांबावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. यामध्ये आज शनिवारी जळगाव जामोद पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क अधिकाऱ्यासमोरच = विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे पणन महासंघ कापूस खरेदी केंद्राद्वारे शेतकरयांचा कापूस खरेदी केला जात आहे. शेतकरी आपल्या शेतातील कापूस ट्रक्टर च्या सहायाने खरेदी केंद्रा बाहेर रांगेत उभा आहे आठ ते दहा दिवसांपासून एकाच ठिकाणी ट्रैक्टर उभे असल्याने अवकाळी पावसाचा फटका कापसाला बसत आहे त्यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होत असून कापूस मालाला योग्य भाव मिळणार नाही अशी शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय ट्रैक्टर चे भाडे दिवसागणिक वाढत असल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याने आज शनिवारी
जळगाव जामोद येथील पणन महासंघाच्या अधिकार्याला घेराव घालून आमचा कापूस खरेदी करा अशी विनंती केली मात्र त्या अधिकाऱ्यांन कापूस खरेदी करन्यास मनाई केली त्यामुळे चिंतेत असलेल्या किशोर दाताळकर नामक शेतकऱ्याने चक्क हातात विषाची बाटली घेऊन विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. मारत यावेळी उपस्थित नागरिकांनी शेतकऱ्याला वाचविले. तर काहींनी कापूस सह ट्रक्टर पेटवून देण्याची धमकी सुद्धा दिली. यामुळे केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. स्थिति हाताबाहेर जात असल्याचे पाहुन कापूस जलदगतीने खरेदी केला जाईल असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

- फहीम देशमुख, जळगाव जामोद (बुलडाणा)Conclusion:
Last Updated : Dec 14, 2019, 8:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.