ETV Bharat / state

बुलडाण्यात डॉक्टर व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने माजी सैनिकांचे रुग्णालयाल बंद

पॉलीक्लिनिक रुग्णालयात केवळ 9 अधिकारी-कर्मचारी सेवा देत आहेत. ज्यामध्ये 2 डॉक्टर आणि उर्वरित कर्मचारी आहेत. यापैकी 2 डॉक्टर आणि 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालय उघडे ठेवणे शक्य नाही.

Ex-servicemen's hospital closed due to positive test of doctors and staff in Buldana
बुलडाण्यात डॉक्टर व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने माजी सैनिकांचे रुग्णालयाल बंद
author img

By

Published : Mar 17, 2021, 6:54 PM IST

बुलडाणा - शासकीय कार्यालयात अधिकारी-कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कामकाजवर परिणाम पडत आहे. असा परिणाम जिल्ह्यातील माजी सैनिक रुग्णालयावर पडला आहे. बुलडाण्याच्या जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या कार्यालयातील माजी सैनिक रुग्णालयातील दोन डॉक्टर व दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने आज बुधवारी 17 मार्च पासून 14 दिवस रुग्णालय बंद ठेवण्यात आल्याचे पत्र लावण्यात आले आहे. यामुळे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या माजी सैनिकांची तारांबळ उडत आहे.

बुलडाण्यात डॉक्टर व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने माजी सैनिकांचे रुग्णालयाल बंद
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या उपचारासाठी बुलडाणा येथे जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या कार्यालयात पॉलीक्लिनिक असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व अन्य पॅरा मेडिकल कर्मचारी नियुक्त आहेत. या पॉलीक्लिनिक मधील 2 डॉक्टर आणि 2 कर्मचाऱ्यांचे मंगळवारी 16 मार्च रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज बुधवारी पासून पुढील 14 दिवसाकरिता पॉलीक्लिनिक रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे. याबाबतचे पत्र रुग्णल्याच्या बाहेर लावण्यात आले आहे. रुग्णालय बंद असल्यामुळे जिल्ह्यातील असंख्य माजी सैनिक व त्यांचे कुटुंबांची गैरसोय होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
रुग्णाची वेगळी व्यवस्था असून उपचारासाठी लागणारा खर्च मिळते परत -
पॉलीक्लिनिक रुग्णालयात केवळ 9 अधिकारी-कर्मचारी सेवा देत आहेत. ज्यामध्ये 2 डॉक्टर आणि उर्वरित कर्मचारी आहेत. यापैकी 2 डॉक्टर आणि 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालय उघडे ठेवणे शक्य नाही. रुग्णालय बंद ठेवल्याने रुग्णाची गैरसोय होणार नाही. शहरातील डॉ.लद्धड हे पॅनल असल्याकारणाने गंभीर परिस्थितील रुग्णांना त्याठिकाणी उपचार देण्यात येतील व ज्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहे. त्यांना उपचारासाठी लागलेला संपूर्ण खर्च परत मिळत असते, अशी प्रतिक्रिया डॉ.सुनील मानमोडे यांनी दिली आहे.

हेही वाचा- सचिन वाझेंना ऑपरेट करणाऱ्यांना शोधणे गरजेचे - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.