ETV Bharat / state

कोरोना संकट : अडीच लाख कर्मचारी देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 कोटींची मदत - Corona Virus

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्यासाठी अनेक संघटना पुढे येत आहेत. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे

employee decided to give fund in cm fund
कोरोना संकट : अडीच लाख कर्मचारी देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 कोटींची मदत
author img

By

Published : Mar 25, 2020, 5:13 PM IST

बुलडाणा - कोरोनाच्या संकटापासून लढण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपली जबाबदारी म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत राज्यातील अडीच लाख कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जवळपास 25 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत जमा होणार आहे.

नंदू सुसर ,जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना
देशासह राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनापासून निपटण्यासाठी खबरदारीसह आरोग्याच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आपली जबाबदारी म्हणून 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत असलेल्या सर्व विभागात कार्यरत वर्ग 3, वर्ग 4 चे सर्व कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिल्याचा निर्णय घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चार ते साडेचार हजार कर्मचाऱ्यांनी तर संपूर्ण राज्यातील अडीच लाख कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार देणार आहेत. जवळपास 25 कोटी रुपयांची मदत दिल्या जाणार आहे. येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या पगारामधून एका दिवसाचा पगार देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष नंदू सुसर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.