ETV Bharat / state

गावात वीज नसल्याची शेतकऱ्याची तक्रार, वीजवितरण अधिकारी म्हणाला... 'फाशी घे' - भोसा

भोसा गावात तीन दिवसांपासून वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्याने वीजवितरणच्या कनिष्ठ अभियंत्याकडे फोनवर तक्रार केली. मात्र कनिष्ठ अभियंत्याने शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ करत वीज नाही, तर मग फाशी घे, असा अजब सल्ला दिला. त्यामुळे वीजवितरणच्या अधिकाऱ्याविरोधात रान पेटले आहे.

शेतकरी धनंजय खंडारकर
author img

By

Published : Jun 27, 2019, 8:33 AM IST

बुलडाणा - गावात तीन दिवसांपासून वीज पुरवठा नसल्याने शेतकऱ्याने याबाबत वीजवितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र तक्रार निवारण करण्याऐवजी अधिकाऱ्याने त्या शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ केली. इतकेच नव्हे, तर वीज नाही, तर मग फाशी घे, असा अनाहूत सल्लाही दिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मेहकर तालुक्यातील भोसा गावात घडली आहे. धनंजय खंडारकर असे संबंधित शेतकऱ्याचे नाव असून दीपक मालोकार असे त्या शिवीगाळ करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.

भोसा गावात मागील ३ दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत असल्याने गाव अंधारात आहे. यासंदर्भात ग्रामस्थ गावच्या लाईनमनला रोज विचारणा करत आहेत, मात्र लाईनमनकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने गावातील शेतकरी धनंजय खंडारकर यांनी कनिष्ठ अभियंता दीपक मालोकारला फोन करून विचारले. यावर मालोकारने धनंजय यांना तुझ्याकडून काय होते, ते कर, असे म्हणत, अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एव्हढेच काय, तर काशी कर अन् फाशी घे असेही म्हटले. घाटबोरीला ये भेटायला थोबाडात मारतो तुझ्या, .... का तू .... अशाप्रकारची उद्धट शब्दात मालोकारने धनंजय यांना सुनावले.

वीजवितरण कार्यालयासह माहिती देताना शेतकरी, अधिकारी आणि विधान सभेत बोलताना आमदार रायमुलकर

शेतकरी धनंजय यांनी दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप तयार करून आमदार संजय रायमुलकर यांना दिली. आमदार रायमुलकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून कनिष्ठ अभियंता मालोकारवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अध्यक्षांनी तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Intro:Body:बुलडाणा -- मेहकर तालुक्यातील भोसा गावातील ३ दिवसांपासून विद्यूत बंद असल्याने विद्युत का गेली,  म्हणून अधिकाऱ्याला विचारले असता शेतकऱ्याला  विद्युत वितरण च्या अधिकाऱ्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून तुझ्याकडून काय होते ते कर अशी उद्धट भाषा वापरली .. एव्हढेच काय एकेरी भाषा वापरून फाशी घे आणि ऑफिस ला आल्यावर पाहून घेईन अशी धमकी दिली .. शेतकरी आणि अधिकारी यांची अश्लील  क्लिप टीव्ही ९ च्या हाती लागलीय .. 
व्हिओ -१-- बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याच्या भोसा गावाची मागील ३ दिवसांपासून लाईट गेल्याने  संपूर्ण गाव अंधारात आहे .. ग्रामस्थ गावच्या लाईनमन ला दररोज विचारात , मात्र लाईनमन कडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आणि गावातील लाईट  येत नसल्याने गावातील शेतकरी धनंजय खंडारकर यांनी जुनिअर इंजिनिअर दीपक मालोकार याना फोन लावून विचारले .. तर जुनिअर इंजिनिअर यांनी शेतकरी धनंजय याना तुझ्याकडून काय होते ते कर , काय ..... म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ केलीय , एव्हढेच काय तर कशी कर अन फाशी घे असाही म्हटलेय .. घाटबोरी ला ये भेटायला  थोबाडात मारतो तुझ्या , ...... का तू .. .. अशाप्रकारची उद्धट शब्दात वागणूक या विद्युत वितरणाच्या अधिकाऱ्याने दिलीय .. 

----- ऑडिओ क्लिप-- शेतकरी आणि अधिकारी .. 

बाईट -- 1)धनंजय खंदारकर , शेतकरी .. 
2) राजेश नाईक,अधिकारी mseb मेहकर

व्हिओ -२-- तर शेतकरी धनंजय यांनी दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप तयार करून मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर याना दिल्यावर आमदार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून जुनिअर इंजिअर मालोकार वर कार्रवाई  करण्याची मागणी कलेची असता अध्यक्षानीया तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या ..

बाईट -- 3)संजय रायमूकर यांचे विधानसभेतील प्रश्न .. 

सूचना -- अश्लील संवादाची  ऑडिओ क्लिप  पाठविली आहे , प्लिज चेक करावी आणि शिवीगाळच्या जागी बीप लावावे..

-वसीम शेख , बुलडाणा -Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.