बुलडाणा - स्थायी समितीच्या सभापतिपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज सोमवारी स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक लावण्यात आली होती. मात्र, निवडणुकीच्या वेळेपर्यंत सभापतिपदासाठी एकही गट स्थापन नसल्यामुळे तसेच एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे आजची निवडणूक रद्द करण्यात आली.
या निवडणुकीसाठी 17 नगरसेवकांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्वच पक्षांचा एकच गट तयार केल्यामुळे अनेक गटनेत्यांनी तथा नगरसेवकांनी गटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली नाही.
हेही वाचा - अंधत्वावर मात करून करतात अगरबत्तीचा धंदा, अंध बांधवांनाही देणार रोजगार
बुलडाणा नगर परिषेदेच्या शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, महिला व बालकल्याण विभागाच्या 5 स्थायी समित्यांच्या सभापती पदाचा 1 वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या आदेशाने बुलडाणा नगर परिषदेत स्थायी समित्या सभापती पदासाठी निवडणूक लावण्यात आली होती. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हांडे तर मुख्याधिकारी महेश वाघमोडे हे सकाळी 11 वाजेपासून 3 वाजेपर्यंत नगर परिषदमध्ये उपस्थित होते. मात्र, शेवटच्या वेळेपर्यंत नगरसेवकांचा एकही गट तयार करून दाखल करण्यात आला नाही. तसेच सभापतिपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशपर्यंत स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक रद्द करण्यात आली.
हेही वाचा - अवैध धंदे बंद करण्यासाठी रणरागिण्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या
बुलडाणा नगर परिषदेत 14 प्रभागात 28 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, शिवसेनेचे - 10, भारिप -2, काँग्रेसचे-5 आणि भाजपचे - 5 असे एकूण 28 नगरसेवक आहेत.