बुलडाणा - लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज (मंगळवारी) थंडावल्या. बुलडाण्यात १८ एप्रिलला मतदान होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण १२ उमेदवार रिंगणात असून प्रामुख्याने ३ उमेदवारांमध्ये खरी लढत असणार आहे.
बुलडाण्यामध्ये आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे, महायुतीचे प्रतापराव जाधव तर वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार या तिघांमध्ये लढत असणार आहे. तीनही उमेदवारांच्या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी शहरामध्ये येऊन प्रचार सभा घेतल्या. सभेमध्ये प्रत्येकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.
आता या ठिकाणी निवडणुकीनंतर तिघांच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.