ETV Bharat / state

धक्कादायक! पैशासाठी दारूड्या मुलाकडून जन्मदात्या आईचा खून; आरोपी फरार - विनोद अवसारमोलकडून आपल्याच आईचा खून

मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंजनी खुर्द येथील कमलाबाई आत्माराम अवसारमोल यांना विनोद अवसारमोल व दिपक अवसारमोल दोन मुले आहेत. यातील विनोद अवसारमोल यास दारूचे व्यसन आहे.

पैशासाठी दारूड्या मुलाकडून जन्मदात्या आईचा खून
author img

By

Published : Aug 19, 2019, 5:03 PM IST

Updated : Aug 19, 2019, 7:23 PM IST

बुलडाणा- दारूड्या मुलाने पैशासाठी वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मेहकर येथील अंजनी खुर्द येथे घडली. रविवारी 18 ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत असलेल्या मुलाने कुऱ्हाडीचे घाव घालून आईचा खून केला. कमलाबाई आत्माराम अवसारमोल(वय ६४) असे मृत महिलेचे नाव आहे. तर विनोद अवसारमोल असे खून करणाऱ्या दारूड्या मुलाचे नाव आहे.

मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंजनी खुर्द येथील कमलाबाई आत्माराम अवसारमोल यांना विनोद अवसारमोल व दिपक अवसारमोल दोन मुले आहेत. यातील विनोद अवसारमोल यास दारूचे व्यसन आहे. रविवारी संध्याकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान विनोद अवसारमोल याने आईला पैसे मागितले. मात्र आईने दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग येऊन त्याने आईवर कुऱ्हाडीने वार केले. यात कमलाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मेहकर पोलीस स्टेशनला त्यांचा मोठा मुलगा दिपक आत्माराम अवसारमोल याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मुलगा विनोद आत्माराम अवसारमोल(वय 40) विरुद्ध कलम 302 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पुढील तपास ठाणेदार आत्माराम प्रधान करत आहेत.

Intro:Body:बुलडाणा : पैश्यासाठी दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:३० वाजता दरम्यान मेहकर येथील अंजनी खुर्द येथे घडलीय. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम अंजनी खुर्द येथे दारू पिण्यासाठी पैश्याच्या वादातून दारूच्या नशेत मारहाण करून कुर्हाडीनें खून केला आहे.सौ कमलाबाई आत्माराम अवसारमोल वय ६४ वर्ष असं त्या मृत्यू पावलेल्या जन्मदात्या आईचे नाव असून विनोद अवसारमोल असे मुलाचं नाव आहे....

मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम अंजनी खुर्द येथील ६४ वर्षीय सौ कमलाबाई आत्माराम अवसारमोल वय ६४ वर्ष याना विनोद अवसारमोल व दीपक अवसारमोल दोन मुले असून यातील विनोद अवसारमोल यास दारू पिण्याची सवय लागलेली होती रविवारी संध्याकाळी ७:३० वाजता दरम्यान विनोद अवसारमोल याने आईला पैसे मागितले मात्र आईने दारू पिण्या साठी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांने घरातून कुऱ्हाड आणली व आईवर कुऱ्हाडीचा वार केले. यात सौ कमलाबाई गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारा साठी दवाखान्यात नेतांना त्यांचा मृत्यू झाला याबाबत मेहकर पोलीस स्टेशनला त्यांचा मोठा मुलगा दीपक आत्माराम अवसारमोल वय ४४ वर्ष याने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी मुलगा विनोद आत्माराम अवसारमोल वय ४० वर्ष या विरुद्ध कलम ३०२,५०४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तपास ठाणेदार आत्माराम प्रधान करीत असून आरोपी सध्या फरार आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Aug 19, 2019, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.