ETV Bharat / state

शेगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, गोठ्यात घुसून ११ शेळ्या केल्या ठार - शेगाव

शेगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. शहरातील जयदेव तायडे यांच्या मालकीच्या गोठ्यातील 11 शेळ्यांना कुत्र्यांनी ठार केले आहे.

ठार झालेल्या शेळ्या
ठार झालेल्या शेळ्या
author img

By

Published : Jan 11, 2020, 1:38 PM IST

बुलडाणा - शेगाव नगरपरिषद हद्दीत येत असलेल्या म्हाडा कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी एका गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढविला. यात ११ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, असे निवेदन सुद्धा परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेला दिले होते. मात्र, त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

शेगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

शेगाव येथील मातंग पूर्व वस्तीमधील नागरिकांना शासनाने शहरालगतच्या म्हाडा कॉलनीमध्ये स्थलांतरित केले असून याठिकाणी सुख-सुविधांचा अभाव आहे. शनिवारी पहाटे या कॉलनीमधील जगदेव फकिरा तायडे यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये लहान-मोठ्या अकरा शेळ्यांच्या जागीच मृत्यू झाला असून दोन बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

जयदेव तायडे हे सकाळी गोठ्यामध्ये गेले असता तेथे कुत्रे बकऱ्यांचे लचके तोडत असल्याचे दिसून आले. या घटनेमध्ये तायडे यांचा 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक वेळा नगरपालिकेमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून ही संख्या पाच हजारांच्यावर असल्याचे नागरिकांनी म्हटले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी पट मुल्ला भागातील पेठ परिसरात लहान बालकांनाही मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मात्र, प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. यामुळे आजच्या घटनेने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती रोष पाहावयास मिळाला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसात मोकाट कुत्र्यांच्या धुमाकूळातून झालेल्या नुकसानीबाबत तक्रार तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा - शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या वाहनाला अपघात, आमदारांसह तिघे जखमी..

Intro:Body:mh_bul_11 goats killed_10047

Story : शेगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ,
गोठ्या घुसून ११ बकऱ्या केल्या ठार
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नगर परिषदेला निवेदन देऊन सुद्धा झाली नाही कार्यवाही,

बुलडाणा : शेगाव नगर परिषद हद्दीत येत असलेल्या म्हाडा कॉलोनीत मध्यरात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालून एका गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढविला. त्यात ११ बकरींचा मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन सुद्धा परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेला दिले, तरी नगर परिषदेचे राजकीय पदाधिकारी व अधिकारी तसेच कर्मचारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत
आहे.
शेगाव येथील मातंग पूर्वी वस्तीमधील नागरिकांना शासनाने शहरालगतच्या म्हाडा कॉलनी मध्ये स्थलांतरित केली असून याठिकाणी सुख सुविधांचा अभाव आहे शनिवारी पहाटे या कॉलनीमधील जगदेव फकिरा तायडे यांच्या मालकीच्या बकऱ्यांच्या गोठ्यामध्ये परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या धुंडाणे गोठ्यामध्ये प्रवेश करून बकऱ्या वर हल्ला केला या हल्ल्यांमध्ये लहान-मोठ्या अकरा बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन बकऱ्या गंभीर जखमी झाले आहेत जयदेव तायडे हे सकाळी गोठ्यामध्ये गेले असता तेथे कुत्रे बकऱ्यांचे लचके तोडत असल्याचे दिसून आले या घटनेमध्ये तायडे यांचा 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे अनेक वेळा नगरपालिकेमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून ही संख्या पाच हजाराच्या वर आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही दिवसांपूर्वी पट मुल्ला भागात पेठ मोहल्ला भागात लहान बालकांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले होते तरीही मात्र प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. यामुळे आजच्या घटनेने नागरिकांमध्ये न.प. प्रशासनाप्रती रोष पाहावयास मिळाला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसात मोकाट कुत्र्यांच्या धुमाकूळातुन झालेल्या नुकसानीबाबततक्रार तक्रार दाखलकरण्याची प्रक्रिया सुरु होती.

बाईट - जयदेव तायडेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.