बुलडाणा - शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानाचे 'आनंदसागर' उद्यान बंद पडण्यासाठी भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आरोप संस्थान विश्वास्थांच्या कुटुंबातील ज्ञानेश्वर पाटील यांनी केला आहे. ज्ञानेश्वर पाटील हे खामगाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते माटरगाव येथील प्रचार सभेत बोलत होते.
हेही वाचा - 'राहुल गांधींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, तेवढ्या आमच्या जागा वाढतील'
श्री संत गजानन महाराज संस्थानाकडून साकारलेले आनंदसागर हे देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी आकर्षक पर्यटन स्थळ बनले होते. मात्र हे पर्यटन स्थळ आता बंद पडले आहे. याविषयी बोलताना ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, "आनंदसागर बंद पडल्याने अनेक व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे. पर्यटकांचा, भाविकांचा हिरमोड होतोय. हे सर्व भाजप सरकारने केले आहे"