ETV Bharat / state

हुतात्मा जवान नितीन राठोड यांच्या चोरपांग्रा गावाचे नाव वीरपांग्रा करण्याचा निर्णय

हुतात्मा जवानाच्या स्मृती कायम राहाव्या, यासाठी गावाचे नाव बदलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. २६ फेब्रुवारीला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तलाठी विनायक पाटील यांनी ग्रामसभेत बोलताना गावाचे नाव बदलण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असल्याचे सांगितले. गावाचे नाव बदलावे आणि चोरपांग्रा ऐवजी वीरपांग्रा असे नामकरण करावे, अशा गावकऱ्यांच्या भावना असल्याचे त्यांनी सांगितले. या ग्रामसभेत याच विषयावर सर्वांचे मत घेऊन चर्चा करण्यात आली.

गावात लागलेले फलक
author img

By

Published : Mar 1, 2019, 7:17 PM IST

बुलडाणा - हुतात्मा जवान नितीन राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावकऱ्यांनी चोरपांग्रा नावात बदल करून वीरपांग्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीला विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी तसा ठराव मंजुर केला आहे. तेव्हापासून गावाला वीरपांग्रा नावाने संबोधण्यात येत आहे. चोरपांग्राचे नाव महसुली नकाशावर वीरपांग्रा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक नितीन सौदर यांनी सांगितले आहे.

संबंधित व्हिडीओ

पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात जिल्ह्यातील २ जवानांना वीरमरण आले होते. त्यामध्ये मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील चोरपांग्रा(गोवर्धन नगर) येथील वीर जवान नितीन राठोड यांचा समावेश होता. चोरपांग्रा गावासह संपूर्ण जिल्ह्यावर या घटनेने शोककळा पसरली होती. या हुतात्मा जवानाच्या स्मृती कायम राहाव्या, यासाठी गावाचे नाव बदलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. २६ फेब्रुवारीला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तलाठी विनायक पाटील यांनी ग्रामसभेत बोलताना गावाचे नाव बदलण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असल्याचे सांगितले. गावाचे नाव बदलावे आणि चोरपांग्रा ऐवजी वीरपांग्रा असे नामकरण करावे, अशा गावकऱ्यांच्या भावना असल्याचे त्यांनी सांगितले. या ग्रामसभेत याच विषयावर सर्वांचे मत घेऊन चर्चा करण्यात आली.

दरम्यान, सर्वांच्या भावना पाहता नामकरणाचा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला. या ठरावाला उपस्थित सर्व गावकऱ्यांनी सहमती दिल्याने गावाचे नाव बदलण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या सभेला सरपंच विठ्ठल चव्हाण, संजय चव्हाण, मधुसूदन डहालके आदी उपस्थित होते.

Intro:बुलडाणा:- हुतात्मा जवान नितीन राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावकऱ्यांनी चोरपांग्रा नावात बदल करून वीरपांग्रा केल्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी 26 फेब्रुवारीला विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी तसा ठराव घेऊन गावाला वीरपांग्रा असे नावाने संबोधण्यात येत आहे तर या नावामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चोरपांग्राचे नाव महसुली नकाश्यावर वीरपांग्रा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक नितीन सौदर यांनी सांगीतले आहे..Body:पुलवामा येथे अतिरेक्यांच्या केलेल्या हल्ल्यात जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण झाले होते त्यामध्ये मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील चोरपांग्रा(गोवर्धन नगर) येथील वीर जवान नितीन राठोड यांचा ही समावेश होता चोरपांग्रा गावासह संपूर्ण जिल्हा दुर्दवी घटनेने हादरला होता आणि सर्वात शोककळा पसरली होती चोरपांग्रा येथील जवान देशासाठी बलिदान दिले त्यामुळे या शहीद जवानाच्या स्मृति कायम राहाव्यात यासाठी गावाचे नाव बदलून शहीद च्या स्मृतिजपण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे दरम्यान याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 26 फेब्रुवारी रोजी ग्रामसभा चे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेला गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती तलाठी बी एल पवार विनायक पाटील यांनी ग्रामसभेत बोलताना गावाचे नाव बदलण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असल्याचे सांगितले आपल्या गावातील जवान देशासाठी शहीद झाल्याने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावाचे नाव बदलावे आणि चोरपांग्रा एवजी वीरपांग्रा असे नामकरण करावे अशा गावकऱ्यांच्या भावना असल्याचे त्यांनी सांगितले या ग्रामसभेत याच विषयावर सर्वांचे मत घेऊन चर्चा करण्यात आली दरम्यान सर्वांच्या भावना पाहता शहीद जवान नितीन राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावाचे नाव बदलून चोरपांग्रा ऐवजी वीर पांग्रा असे नामकरण करावे असा ठराव ग्रामसभेत मांडण्यात या ठरावाला उपस्थित सर्व गावकऱ्यांनी सहमती दिल्याने गावाचे नाव बदलण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला या सभेला विठ्ठल चव्हाण सरपंच संजय चव्हाण मधुसूदन डहालके योगेश जायभाये सुनील जायभाये कैलाश चाय पंढरी डहालके यासह गावकरी सभेला उपस्थित होते..

बाईट-1) नितीन सौदर,ग्रामसेवक
2) आत्माराम जायभाए, गावकरी
3) पुंडलिक जायभाए, गावकरी
4) गावकरी

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.