बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आत्मदहन आंदोलन केले होते. यानंतर तुपकरांसह काही आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करायला सुरूवात केली आहे. मात्र, रविकांत तुपकारांचे अन्न त्याग आंदोलन सुरूच असल्यामुळे तुपकारांची तब्बेत खालावल्याची माहिती समोर आली आहे.
रविकांत तुपकरांचे आत्मदहन आंदोलन : शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम पूर्ण मिळावी तसेच अतिवृष्टीची रक्कम मिळावी यासाठी चार दिवसाअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकरांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदाहन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला होता. यात काही शेतकरी जखमी झाले व रविकांत तुपकर व 25 शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच न्यायाल्यासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन : रविकांत तुपकर यांनी गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले आहे. आजही अकोला कारागृहात त्यांचे अन्न त्याग आंदोलन सुरूच आहे. त्यात तुपकरांची तब्बेत खालावल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, सरकारने या आंदोलनाचा धसका घेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो रुपये जमा होत आहेत. तुपकर जरी कारागृहात असले तरी मात्र शेतकऱ्यांना इकडे आर्थिक लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.
तुपकर न्यायालयीत कोठडीत : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 11 फेब्रुवारीला आत्मदहन आंदोलन केले होते. पोलिसांनी बळाचा वापर करून तुपकर यांच्यासह २५ आंदोलकांना अटक केली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना चिखलीच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यासह २५ साथीदारांना कडेकोट बंदोबस्तात बुलडाणा व जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने तुपकर यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
रविकांत तुपकरांचा अन्यायाविरुद्ध लढा: शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर सप्टेंबर 2022 पासून लढा देत आहेत. 6 नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात एल्गार मोर्चा, 24 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत जलसमाधी आंदोलन त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर राज्याचे कृषी सचिव, कृषी आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि त्याचा पाठपुरावा करून त्याचे पत्र केंद्राला पाठविण्यात आले होते.
हेही वाचा : Ravikant Tupkar Buldhana : रविकांत तुपकरांच्या अडचणीत वाढ; न्यायलयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी