ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात 6 केद्रांवरून कोरोना लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात

बुलडाणा जिल्ह्यातील सहा लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे 600 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यास प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यामध्ये एकूण 646 आरोग्य संस्थांमध्ये 13 हजार 960 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या फेरीत लसी देण्यात येणार आहे.

लस टोचवून घेताना
लस टोचवून घेताना
author img

By

Published : Jan 16, 2021, 4:20 PM IST

Updated : Jan 16, 2021, 6:14 PM IST

बुलडाणा - कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आज (16 जानेवारी) बुलडाणा जिल्ह्यातील सहा लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे 600 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यास प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात झाला आहे. यावेळी डॉ. सोनाली मुंढे यांनी पहीली लस घेतली.

बोलताना अधिकारी व कोरोना योद्धा

पहिल्या फेरीत 13 हजार 960 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

जिल्ह्यामध्ये एकूण 646 आरोग्य संस्थांमध्ये 13 हजार 960 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या फेरीत लसी देण्यात येणार आहे. लसीकरणानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास त्वरित रुग्णवाहिकेद्वारे संबंधीताची शासकीय किंवा खासगी रूग्णालयात उपचाराची सुविधा करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये लसीकरण सत्रामध्ये कोविन ॲपवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या नोंदणीची पडताळणी करण्यासाठी प्रतिक्षा कक्ष, प्रत्यक्षात लस देण्यासाठी लसीकरण कक्ष व लसीकरणानंतर 30 मिनीटे थांबण्यासाठी निरीक्षण कक्ष अशा त्रिस्तरीय रचना लसीकरण केंद्रात करण्यात आली आहे.

लसीचे इंजेक्शन हे ऑटो डिजीबल

लस ही उजव्या दंडाच्या वरील बाजूस देण्यात येत आहे. लसीचे इंजेक्शन हे ऑटो डिजीबल आहे. त्यामुळे एका इंजेक्शनने एकाच व्यक्तीला लस दिली जात असून पहिली लस दिल्यानंतर दुसरी लस 28 दिवसानंतर देण्यात येणार आहे. दुसऱ्या डोससाठीही लाभार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात येणार आहे.

दुसऱ्या डोसनंतर 15 दिवसांनी होणार शरीरात प्रति पिंड तयार

दुसऱ्या डोसनंतर 15 दिवसांनी कोविड आजाराशी लढण्यासाठी प्रति पिंड (अ‌ॅन्टबॉडीज्) शरीरात तयार होणार आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतर कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर व हात धुणे किंवा सॅनिटाईज करणे या त्रिसुत्रींचा अवलंब करावा लागणार आहे.

लस घेणाऱ्या डॉक्टरांचे आव्हान

कोरोनाची लस देण्यास प्रत्यक्ष शुभारंभानंतर जिल्ह्यातून पहिली लस दंतरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली मुंढे यांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर डॉ. सोनाली मुंढे म्हणाल्या, मला लस घेताना मला खूप आनंद होत आहे. लस घेतल्यानंतर मला काहीही त्रास झालेला नाही. मी जनतेला आवाहन करते की, सगळ्यांनी न भिता हा डोस घ्यावा.

Last Updated : Jan 16, 2021, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.