ETV Bharat / state

बुलडाण्यात अनैतिक संबंधातून जोडप्याची आत्महत्या? - प्रेमी युगल

प्रेमीयुगुलाने 5 ऑक्टोबरला शेगाव येथे एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये 205 क्रमांकाची खोली भाड्याने घेतली. ते दोघे 2 दिवस सोबत राहिले. मात्र, सोमवारी सकाळीपासून 205 क्रमांकाच्या खोलीतून हालचाल दिसत नसल्याने आणि प्रतिसाद मिळत नसल्याने गेस्ट हाऊस मालकाने खोलीची पाहणी केली.

विवाहबाह्य संबंधातून प्रेमी युगलाची आत्महत्या
author img

By

Published : Oct 7, 2019, 4:32 PM IST

Updated : Oct 7, 2019, 5:32 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील शेगाव शहरात नागपूर येथील एका विवाहित जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या जोडप्याने सोमवारी सकाळी गेस्ट हाऊसमध्ये विष पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नंदू कृष्णाजी मसराम (वय 40) आणि भारती कैलास सुरपाम (वय 30, दोघेही रा. सालई गोंधणी धामणा, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.

विवाहबाह्य संबंधातून प्रेमी युगलाची आत्महत्या

हेही वाचा - 'पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी'

याबाबत अधिक माहिती अशी, की या प्रेमीयुगुलाने 5 ऑक्टोबरला शेगाव येथे एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये 205 क्रमांकाची खोली भाड्याने घेतली. ते दोघे 2 दिवस सोबत राहिले. मात्र, सोमवारी सकाळीपासून 205 क्रमांकाच्या खोलीतून हालचाल दिसत नसल्याने आणि प्रतिसाद मिळत नसल्याने गेस्ट हाऊस मालकाने खोलीची पाहणी केली.

हेही वाचा - बुलडाण्यात गारपीटीने पिकांचे नुकसान; शेतकरी हतबल

त्यावेळी नंदू आणि भारती दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. दोघांनी विष पिऊन आपली जीवन यात्रा संपविल्याचे दिसून आले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Intro:Body:

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात नागपूर येथील एका जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नंदू कृष्णाजी मसराम ( वय वर्षे 40, रा.सालई गोंधणी धामणा , नागपूर ) व भारती कैलास सुरपाम (वय 30 वर्षे, रा.सालई गोंधणी धामणा, नागपूर) असे मृत जोडप्याचे नाव आहे. या जोडप्याने सोमवारी सकाळी गेस्ट हाऊस मध्ये विष घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात आणि प्रेमात पडण्यासाठी काही वेळाचं बंधन नसतं असेही म्हणतात या दोन्ही म्हणी शेगावात एका विवाहित प्रेमी जोडप्याने केलेल्या आत्महत्ये वरून दिसून येते. .सालई गोंधणी धामणा, नागपूर येथील रहिवाशी असलेले नंदू कृष्णाजी मसराम वय वर्षे 40,आणि भारती कैलास सुरपाम वय 30 वर्षे या प्रेमी युगलाने ५ ऑकटोम्बर रोजी शेगाव येथे येऊन एका खाजगी गेस्ट हाऊज मध्ये २०५ क्रमांकाची खोली भाड्याने घेतली. दोन दिवस सोबत हि राहिले मात्र आज सोमवारी सकाळ पासून २०५ क्रमांकाच्या खोलीतून हालचाल दिसत नसल्यानेआणि प्रतिसाद मिळत नसल्याने गेस्ट हाऊस मालकाने खोलीत पाहणी केली असता दोघेही पलंगावर मृत अवस्थेत असल्याचे दिसल्यावरून यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी खोलीचा दरवाजा मास्तर चवीने खोलून दोन्ही प्रेत पंचनामा करून ताब्यात घेतले. दोघांनी विष प्रश्न करून आपली जीवन यात्रा संपविल्याचे दिसून आले. दोघांच्या नातेवाईकांना नागपूर पोलिसांच्या माध्यमाने कळविण्यात आले आहे. प्रेत उत्तरात तपासणी साठी रुग्णालयात हलविण्यात आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

Attach Vidio File - 05
Attach Foto File - 02
Attach Audio File - 00
-----------------------------------------------

- फहीम देशमुख, शेगाव
मोबा - 9922014466Conclusion:
Last Updated : Oct 7, 2019, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.