ETV Bharat / state

बुलडाणा : खामगावात विनाकारण फिरणाऱ्यांची केली जाते कोरोना चाचणी

author img

By

Published : Apr 18, 2021, 4:40 PM IST

अनेक नागरिक राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून खामगावामध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना रॅपिड चाचणी केली जात आहे.

corona test of people who is roaming without any reason in khamgaon
बुलडाणा : खामगावात विनाकारण फिरणाऱ्यांची केली जाते कोरोना चाचणी

बुलडाणा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करून विनाकारण न फिरण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. तरीही बरेच लोक राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून खामगावामध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना रॅपिड चाचणी केली जात आहे.

प्रतिक्रिया

१२५ जणांची करण्यात आली रॅपिड कोरोना चाचणी -

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्याही ५१ हजाराच्यावर पोहोचली आहे. तर ६ हजारांच्यावर कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. मात्र, वाढत्या रुग्ण संख्येने आरोग्य यंत्रणा व प्रशासन पूर्णपणे गोंधळून गेले आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी यंत्रणेची धावपळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस, नगरपरिषद, महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची रॅपिडद्वारे कोरोना चाचणी केली जात आहे. सकाळपासून रस्त्यावर विनाकारण पायी फिरणारे, दुचाकी व चार चाकी वाहनांमधून फिरणाऱ्यांची चाचणी केली जात आहे. शिवाय विनामास्क फिरणाऱ्यावर दांडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाईमध्ये १२५ जणांची चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये ६ जण हे कोरोना बाधीत म्हणून आढळले आहेत.

अत्यावश्यक आस्थापना चालक व मालकांचीही चाचणी -

खामगाव शहरातील जे अत्यावश्यक आस्थापना आहेत, त्या आस्थपनात काम करणारे लोक आणि मालक यांचेदेखील गांधी बगीच्यामध्ये रॅपिडद्वारे कोरोना चाचणी करण्यात येत आहे. सर्व आस्थपना चालकांना आदेशाप्रमाणे दर १५ दिवसानंतर चाचणी करणे बंधनकारक असून सगळ्यांनी चाचणी करून घेण्याचे व विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन खामगाव उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा - दिलासादायक! औरंगाबादच्या चार रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.