ETV Bharat / state

Buldhana Crime : धक्कादायक! गर्लफ्रेंडनं दिला धोका अन् बुलढाण्यातील काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या शहराध्यक्षाने केली आत्महत्या

गर्लफ्रेंडने धोका दिल्याने काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणातील देऊळगाव मही येथील काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष गजानन गुरव याने व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवत आत्महत्या केली.

Buldhana Crime
गजानन गुरव
author img

By

Published : Mar 17, 2023, 3:32 PM IST

बुलढाणा : प्रेमप्रकरणातून रोजच धक्कादायक घटना समोर येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा येथील कॉंग्रेस शहराध्यक्षाने गर्लफ्रेंडने धोका दिल्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. अपनी रानी किसी की दीवानी हो गई अशा आशयाचे त्याने व्हाट्सअप व इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवत आत्महत्या केली आहे.

प्रेमप्रकरणातून आत्महत्या : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात देऊळगाव मही येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्ष गजानन गुरव या 26 वर्षीय युवकाने गर्लफ्रेंडने धोका दिला म्हणून आत्महत्या केली आहे. गावातीलच एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र, या युवतीने दुसऱ्याशी आपले नाते जुळवल्यामुळे नैराश्यातून गजानन गुरव याने खंडोबा मंदिर परिसरात आत्महत्या केली आहे. आपल्या प्रियसीने प्रेमात धोका दिला असल्याचे गजाननने आपल्या व्हाट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्रामच्या स्टेटस वर व्हिडिओ ठेवत आत्महत्या केली आहे. आपल्या मित्र परिवाराला भावनिक स्टेटस सुद्धा गजाननाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होतं. त्यामुळे गर्लफ्रेंडने प्रेमात धोका दिल्याने, अपनी राणी किसी की दीवानी हो गई, असे म्हणत या युवकाने आपली जीवन यात्रा संपवली आहे.

व्हाट्सअपवर केले होते आवाहन : प्रियसीने प्रेमात धोका दिल्यानंतर गजूने आपली जीवन यात्रा संपवली. मात्र, जीवाला जीव देणारे आणि ऐन गरजेच्या वेळी धावून येणाऱ्या मित्रांना सुद्धा गजू मरताना विसरला नाही. आत्महत्या करण्यापूर्वी स्टेटसवर गजानन गुरवने आपल्या मित्रांना देखील एक आवाहन केले होते. एका अंतयात्रेचे त्याने स्टेटस आपल्या व्हाट्सअपवर ठेवून मित्रांना आवाहन करत तुम्हीही या पद्धतीने माझी अंतयात्रा काढणार ना? असे भावनिक आवाहन गजाननने केले होते. देऊळगाव राजा तालुक्यात गजानन गुरव याने आपल्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे बराच मित्रपरिवार जमवला होता. मित्रांनी ज्या पद्धतीने या गजानन गुरवणे स्टेटसवर ठेवले होते अगदी त्याच पद्धतीने त्याची अंत्ययात्रा काढली आहे. मित्रांची अंत्ययात्रेत मोठी गर्दी झाल्याचही पाहायला मिळाले. त्यामुळे गजानन गुरवची ही एक्झिट अनेक मित्रांना चटका लावून जाणारी ठरली आहे.

हेही वाचा : ED raids in Chhatrapati Sambhaji Nagar : १ हजार कोटींची सरकारची फसवणूक? ईडीचे छत्रपती संभाजीनगरात तीन ठिकाणी छापे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.