बुलडाणा- शेतकरी व कामागरांच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या कृषी कायद्यांविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज खामगाव येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. स्व.राजीव गांधी उद्यान येथील जयस्तंभ समोर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
आज दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हुतात्मा दिवस आहे, तसेच लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती आहे. या निमित्त काँग्रेस पक्षाने ‘किसान अधिकार बचाव दिवस’ म्हणून पाळण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आज काँग्रेसतर्फे हे आंदोलन झाले. आंदोलनात कामगार, शेतकरी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी रद्द करा, रद्द करा, शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या.
हेही वाचा- यवतमाळ कोरोना अपडेट : 52 जण कोरोनामुक्त; 47 नवे रुग्ण आढळले