ETV Bharat / state

खामगाव मतदारसंघात काँग्रेसकडून ज्ञानेश्वरदादा पाटील यांची उमेदवारी दाखल - khamgaon constituency

काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोकसेठ सानंदा, धनंजय देशमुख व काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत खामगांव एसडीओ कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

खामगाव मतदार संघात काँग्रेसकडून ज्ञानेश्वरदादा पाटील यांची उमेदवारी दाखल
author img

By

Published : Oct 5, 2019, 7:53 AM IST

बुलडाणा - खामगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी शुक्रवारी 4 सप्टेंबरला असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

खामगाव मतदार संघात काँग्रेसकडून ज्ञानेश्वरदादा पाटील यांची उमेदवारी दाखल

हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : आघाडीच्या विजयाची हॅट्रिक.. 'मनसे'चा धडाकेबाज प्रवेश अन् आदर्श व सिंचन घोटाळा

काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोकसेठ सानंदा, धनंजय देशमुख व काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत खामगाव एसडीओ कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी बोलतांना ज्ञानेश्वरदादा पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याकरीता ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून यात मी यशस्वी होणारच असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - 'आता बारा वाजणार'; प्रकाश मेहतांचा इशारा

तत्पुर्वी गांधी चौकात काँग्रेस नेत्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला दिलीपकुमार सानंदा यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना सानंदा यांनी भाजपा सरकारच्या विरोधात टिकेची झोड उठविली. या सभेला काँग्रेस पक्षातील नेते आणि पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. सभा समाप्तीनंतर माजी आमदार सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून प्रचार रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅलीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर करण्यात आला. यावेळी हजारो नागरीकांची उपस्थिती होती.

Intro:Body:बुलडाणा:- खामगांव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामूळे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विविध चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

काँग्रेसचे माजी आ.दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोकसेठ सानंदा, धनंजय देशमुख व काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह हजारो कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत खामगांव एसडीओ कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी बोलतांना ज्ञानेश्वरदादा पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याकरीता ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून यशस्वी होणारच असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पुर्वी स्थानिक गांधी चौकात काँग्रेस नेत्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला आ.दिलीपकुमार सानंदा यांनी संबोधित केले. यावेळी बोलतांना सानंदा यांनी भाजपा सरकारच्या विरोधात टिकेची झोड उठविली. या सभेला काँग्रेस पक्षातील नेते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. सभा समाप्तीनंतर माजी आ.सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून प्रचार रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सदरहु रॅलीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर करण्यात आला. सभास्थळी व रॅलीमध्ये हजारो नागरीकांची उपस्थिती होती.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.