ETV Bharat / state

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ७१ शिक्षक बीएलओंवर गुन्हे दाखल; राज्यातील सर्वात मोठी कारवाई - निवडणूक निर्णायक अधिकारी मेहकर

११ नोव्हेंबर ते १३ फेब्रुवारी दरम्यान बीएलओ हायब्रीड अॅपनुसार निवडणूक विभागाने मतदार पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात मेहकर तालुक्यातील २ लाख १७ हजार ८८ मतदारांचे पुनर्निरीक्षण करायचे होते. यासाठी २४१ शिक्षकांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून निवड करण्यात आली होती.

७१ शिक्षक बीएलओंवर गुन्हे
७१ शिक्षक बीएलओंवर गुन्हे
author img

By

Published : Feb 5, 2020, 7:48 PM IST

बुलडाणा - निवडणूक विभागामार्फत दिलेल्या मतदार पडताळणीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मेहकर तालुक्यातील ७१ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असून या शिक्षकांनी शून्य टक्के काम केल्याचे निदर्शनास आले आहे.

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ७१ शिक्षक बीएलओंवर गुन्हे दाखल

११ नव्हेंबर ते १३ फेब्रुवारी दरम्यान बीएलओ हायब्रीड अॅपनुसार निवडणूक विभागाने मतदार पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात मेहकर तालुक्यातील २ लाख १७ हजार ८८ मतदारांचे पुनर्निरीक्षण करायचे होते. यासाठी २४१ शिक्षकांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, तीन महिने उलटूनही मेहकर तालुक्यातील मतदार पडताळणीचे सात टक्केच काम झाले आहे. निवडणूक विभागाने या बीएलओ शिक्षकांना वेळोवेळी सूचना दिल्या. कारणे दाखवा नोटीसाही दिल्या मात्र, याचा परिणाम झाला नाही.

हेही वाचा - महाराष्ट्रातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

त्यामुळे शून्य टक्के काम करणाऱ्या ७१ बीएलओ शिक्षकांवर निवडणूक निर्णायक अधिकारी तथा नायब तहसीलदार पंकज मगर यांनी मेहकर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील १२० क्रमांकाच्या बूथवर पुनर्मतदान झाले होते. त्या बुथवरील कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यामुळे मेहकर तालुका चर्चेत आला होता. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ७१ बीएलओंवर कारवाई झाल्याने पुन्हा मेहकर तालुका चर्चेत आला आहे.

Intro:Body:बुलडाणा:- निवडणूक विभागामार्फत मतदार पडताळणी कार्यक्रमात आपल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मेहकर तालुक्यातील ७१ शिक्षक बीएओंवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई राज्यातील सर्वात मोठी कारवाई असून सदर शिक्षकांनी ० टक्के काम केल्याचे निदर्शनास आले आहे.

निवडणूक विभागाने मतदार पडताळणी कार्यक्रम ११ नव्हेंबर ते १३ फेब्रुवारी दरम्यान बी एल ओ हायब्रीड अँप नुसार ऑनलाइन करण्याचे आदेश दिले आहे यात मेहकर तालुक्यातील २ लाख १७ हजार ८८ मतदाराचे पुननिरीक्षन करावयाचे होते या साठी २४१ शिक्षकांची मतदार केंद्र स्तरीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आलेली होती मात्र तीन महिने होत आले तरी मेहकर तालुक्यातील मतदार पडताळणीचे काम ७ टक्यावरच असल्याने निवडणूक विभागाने बी एल ओ शिक्षकांना वेळोवेळी सूचना दिल्या समज देण्या साठी कारणे दाखवा नोटीस दिल्या मात्र काहीही परिणाम झाला नाही अश्यात ० शून्य टक्के काम करणाऱ्या ७१ बीएओंवर ४ मंगळवारी फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णायक अधिकारी तथा नायब तहसीलदार पंकज मगर यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षका बीएओंवर मेहकर पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधींत्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ नुसार व भारतीय दंड सहिता १८६० चे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केले आले.
या पूर्वी मेहकर तालुक्यातील ग्राम डोणगांव येथील १२० क्रमांकाच्या बूथ क्रमांकावर पुनर मतदान झाल्याने व त्या बुथवरील कर्मचारी निलंबित झाल्याने हा मेहकर तालुका देशभरात चर्चेत आला होता अश्यातच आपल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ७१ बीएओंवर कारवाई झाल्याने पुन्हा मेहकर तालुका चर्चेत आला आहे..

बाईट:-1) गणेश राठोड,उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेहकर

2) सुनील आहेर, नायब तहसीलदार, निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-

फोटो वर फैश करावे...रेडी तू एअर करून पाठवित आहे...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.