ETV Bharat / state

दसऱ्याच्या निमित्ताने बांबूने तयार केलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन 1 तास फटाक्यांचे आकर्षण - दसरा खामगाव बुलडाणा

दसऱ्यानिमित्त खामगाव येथे ५० फुट उंच बांबूच्या माध्यमाने रावणाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याला अग्नी देण्यात आली. यावेळी १ तास फटाक्यांच्या आतिषबाजी सुरू होती.

रावणदहन कार्यक्रम, रावण टेकडी खामगाव
author img

By

Published : Oct 9, 2019, 9:03 AM IST

बुलडाणा - दसरा म्हणजेच आनंद आणि मांगल्याचा सण. वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी असेही म्हणतात. महाराष्ट्रासह देशभरात मंगळवारी दसरा उत्साहात साजरा केला गेला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात ५० फूट उंच बांबूच्या माध्यमाने रावणाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याला अग्नी देण्यात आली. यावेळी १ तास चाललेल्या फटाक्याच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेले होते. तर, दुसरीकडे दसऱ्याच्या निमिताने एकमेकांना शुभेच्छा देत लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.

रावणदहन कार्यक्रम, रावण टेकडी खामगाव

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूराचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. या दिवशी रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. या सणानिमित्त जिल्ह्यातील खामगावात बांबूने तयार केलेल्या ५० फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर, दसऱ्याच्या निमिताने एकमेकांना शुभेच्छा देत लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.

हेही वाचा - 'सबका साथ, सबका विकास' हाच माझा ध्यास - अॅड.आकाश फुंडकर
खामगाव शहरात मंगळवारी विजयादशमी निमित्ताने शहराबाहेरील रावण टेकडी भागात रावणाचा ५० फुटी उंच प्रतीकात्मक पुतळा उभारून त्याचे दहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दसऱ्याच्या निमिताने झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे घराघरात तोरण बांधण्यात आले. दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. यादिवशी नागरिकांनी एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - बुलडाण्यात बंडखोरांना शांत करण्यात प्रमुख पक्षांना यश, शेवटच्या दिवशी अर्ज मागे

Intro:Body:बुलडाणा : आनंद आणि मांगल्याचा सण....वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी, म्हणजेच दसरा...महाराष्ट्रासह देशभरात आज दसरा साजरा केला जातोय. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथे ५० फूट उंच बांबूच्या माध्यमाने रावणाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याला अग्नी देण्यात आली. यावेळी १ तास चाललेल्या फटाक्याच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेले होते. दुसरी कडे दसऱ्याच्या सणा निमिताने एकमेकांना शुभेच्छा देत लहान्यांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. हि दोन्ही सण बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात बांबूने तयार केलेल्या ५० फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले तर दसऱ्या च्या निमिताने एकमेकांना शुभेच्छा देत लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात आज मंगळवारी विजयादशमी निमित्ताने शहराबाहेरील रावण टेकळी भागात रावणाचा ५० फुटी उंच प्रतीकात्मक पुतळा उभारून त्याचे दहन करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. तर दसऱ्याच्या निमिताने झेंडूची फुले आणि आंब्याची पाने घराघरात फुलांचे तोरण बांधले होते. यावेळी आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या.

mh_bul_Combustion of Ravan Statue_01

Attach Vidio File - 05
Attach Foto File - 00
Attach Audio File - 00
-----------------------------------------------
- फहीम देशमुख, खामगाव (बुलडाणा)
मोबाईल - 09922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.