ETV Bharat / state

राजकीय दबावाला कंटाळून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, आमदारांच्या विनंतीनंतर घेतले राजीनामे मागे

जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर अगोदरच प्रचंड ताण आहे. आणि आता त्यात भरीसभर म्हणून मलकापूरमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे. याविरोधात त्यांनी 1 मेला सामूहिक राजीनामे देखील दिले होते. मात्र आमदार राजेश इकडे यांनी मनधरणी केल्यानंतर हे राजीनामे माघारी घेण्यात आले आहेत.

author img

By

Published : May 2, 2021, 10:31 PM IST

राजकीय दबावाला कंटाळून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

बुलडाणा - जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर अगोदरच प्रचंड ताण आहे. आणि आता त्यात भरीसभर म्हणून मलकापूरमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे. याविरोधात त्यांनी 1 मेला सामूहिक राजीनामे देखील दिले होते. मात्र आमदार राजेश इकडे यांनी मनधरणी केल्यानंतर हे राजीनामे माघारी घेण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यावरून नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते, या आरोपानंतर डॉक्टरांनी सामुहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

रुग्णालयांमधील रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण, आणि त्याचवेळी रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांकडून निर्माण करण्यात येत असलेला दबाव यामुळे डॉक्टर जेरीस आले आहेत. केवळ डॉक्टरच नव्हे, तर कर्मचाऱ्यांनाही सतत तणावग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोविडच्या रुग्णांना हाताळत असतांना डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा बिकट परिस्थितीतून आरोग्य कर्मचारी जात असताना, स्थानिक पुढाऱ्यांकडून दबाव निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप करत, मलकापूरमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले राजीनामे वैद्यकीय अधीक्षकांकडे सादर केले होते, मात्र वैद्याकीय अधीक्षकांनी याची माहिती मलकापूरचे आमदार राजेश एकडे, तहसीसदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिली. राजीनाम्याची माहिती मिळताच आमदार एकडे यांनी कोविड रुग्णालय गाठून डॉक्टर व कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली, व त्यांना राजीनामे परत घेण्याची विनंती केली. त्यानंतर या वैद्याकीय अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे परत घेतले.

विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप

मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केंद्रामध्ये शुक्रवारी 30 एप्रिल रोजी रात्री दिड ते पावणे दोन तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान व्हेंटिलेटर वर असलेला एक रुग्ण दगावला. तर रुग्णालयातील इतर रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात येत होते. या घटनेची माहिती मिळताच मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी कोविड केंद्राला भेट देवून, कोविड केंद्रातील विद्युत नसल्याने जरनेटर आहे किंवा नाही, याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली होती, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

रुग्णाचा आधिच मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधीक्षकांचा दावा

शुक्रवारी रात्री एक ते दिड तास मलकापूर शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र संबंधित रुग्णाचा मृत्यू हा आधिच झाल्याचे स्पष्टीकरण मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नाफडे यांनी दिले. ते पुढे बोलताना म्हणाले की, वृद्युत पुरवठा हा अंदाजे 9 वाजून 35 मिनिटांनी खंडीत झाला होता, आणि या रुग्णांचा मृत्यू त्यापूर्वीच म्हणजे 9 वाजून 20 मिनिटांनी झाला. त्यामुळे या घटनेशी त्या रुग्णाचा काही संबंध नाही. तसेच विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर देखील 4 तास व्हेटिलेटर हे त्यामध्ये असलेल्या बॅटरीमुळे सुरूच राहाते असं देखील ते यावेळी म्हणाले.

नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी फेटाळले आरोप

दरम्यान दुसरीकडे हरिष रावळ यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्य़ा आरोपांवर बोलताना म्हणले आहे की, जे रुग्ण ग्रामीण भागातून येतात, त्यांना अनेकवेळा बेड खाली असून देखील बेड मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी जर रुग्णालय प्रशासनाला विनंती केली, तर तो दबाव होत नाही. लोकांनी मला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या समस्या सोडवणे माझे कामच असल्याचे त्यांनी म्हणले आहे.

हेही वाचा - यूपी : भयाण वास्तव, ऑक्सिजन बेड मिळेना; मुलींनी आईला तोंडातून दिला ऑक्सिजन, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.