बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चिखली येथे दुचाकी रॅली काढल्याच्या कारणावरून भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि पस्तीस महिलांवर चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कोरोना संसर्ग प्रतिबंधाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. (MLA Shweta Mahale Against Case Registered) विशेष म्हणजे, जिल्ह्यात 144 कलम लागू असतानाही या कलमचे उल्लंघन केले असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. त्यासोबतच या रॅलीला परवानगी नसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यासोबत पस्तीस लोकांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित दुचाकी रॅली निमित्त ही कारवाई करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीने मास्क घातले नव्हते. सोशल डिस्टंसिंगही पाळले नव्हते. यामध्ये सर्वात जास्त महिलांचा सहभाग होता.
35 महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले, तरीही राज्यात कोरोना प्रतिबंध संसर्ग कायदा लागू आहे. यामुळे गर्दी करू नये, मास्क घालने, सामाजिक अंतर ठेवणे यासारखे नियम अजूनही पाळण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यावर कारवाई केल्या जाईल, असेही शासनाने म्हटलेले आहे. श्वेता महाले आणि इतर 35 महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच कोरोना संसर्ग प्रतिबंध नियमांचे कलमही लावण्यात आले आहेत.
आम्ही जिजाऊंच्या लेकी
आमची दुचाकी रॅली ही शांततेत होती. आम्ही जिजाऊंच्या मुली आहोत. आमच्यावर जर पोलिसांनी कारवाई केली असेल ती पण शिवजयंती साजरी करत असताना तर याचा अभिमान आम्हाला आहे, आम्ही असा प्रकार वारंवार करू, अशी प्रतिक्रिया आमदार श्वेता महाले यांनी दिली.
हेही वाचा - रशियाने दोन फुटीरतावादी प्रदेशांना स्वातंत्र्याची मान्यता; सुरक्षा परिषदेच्या बैठकीत युक्रेनची जोरदार हरकत