ETV Bharat / state

Raju Kendre in Forbs 30 Under 30 : उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील नेतृत्त्व उभं राहावं हा प्रयत्न - चेवनिंग स्कॉलर राजू केंद्रेंसोबत संवाद - Chevening Scholar Raju Kendre ETV Bharat

उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील नेतृत्त्व उभं राहावं, हा आमचा प्रयत्न आहे, असं मत चेवेनिंग स्कॉलर राजू केंद्रे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केलं. फोर्ब्स इंडिया या जगप्रसिद्ध मासिकाने राजू केंद्रेंचा भारतातील 30 वर्ष वयोगटातील प्रभावशाली पहिल्या 30 तरुणांमध्ये ( Forbes 30 Under 30 ) समावेश केला. यानिमित्ताने ईटीव्ही भारतने त्यांची विशेष मुलाखत घेतली. ( Raju Kendra Interview with ETV Bharat )

Raju Kendra Interview with ETV Bharat
चेवनिंग स्कॉलर राजू केंद्रेंसोबत संवाद
author img

By

Published : Feb 10, 2022, 8:07 AM IST

हैदराबाद - सर्वच क्षेत्रात तळागाळातील नेतृत्त्व उभं राहिलं पाहिजे, यासाठी उच्च शिक्षण महत्त्वाचं आहे. उच्च शिक्षण हे नेतृत्त्व विकसित करतं. Forbes 30 Under 30, Chevening काय आहे? हे नेतृत्त्वाचं एक व्यासपीठ आहे. उच्च शिक्षणामुळे आज मी लंडनला टाटा इन्स्टिट्यूला किंवा फिल्डमध्ये जे शिकलो, त्यामुळे मी स्वत:मधील नेतृत्वगुण सिद्ध करू शकलो. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील नेतृत्त्व उभं राहावं, हा आमचा प्रयत्न आहे, असं मत चेवेनिंग स्कॉलर राजू केंद्रे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केलं. फोर्ब्स इंडिया या जगप्रसिद्ध मासिकाने राजू केंद्रेंचा भारतातील 30 वर्ष वयोगटातील प्रभावशाली पहिल्या 30 तरुणांमध्ये ( Forbes 30 Under 30 ) समावेश केला. यानिमित्ताने ईटीव्ही भारतने त्यांची विशेष मुलाखत घेतली.

ईटीव्ही भारतने घेतलेली चेवनिंग स्कॉलर राजू केंद्रे यांची घेतेलेली मुलाखत
  • प्रश्न - ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित चेवनिंग स्कॉलरशिप मिळाली. यानंतर अवघ्या काही महिन्यातच तुम्हाला फोर्ब्स इंडिया या मॅगेझिनमध्ये पहिल्या 30 प्रतिभाशाली तरुणांमध्ये स्थान देण्यात आलंय. कसं वाटतंय?

उत्तर - हा अभिमानाचा क्षण आहे. भटक्या, वंचित समाजातून कदाचित मला वाटत नाही याआधी कुणाचं नाव आलं असेल, असं मला वाटत नाही. याआधी सिनेतारकांचं नाव ऐकलं होतं. तुम्ही स्वत: ग्रामीण भागातून आहात. आपण ज्या भागातून येतो, तिथून फोर्ब्समध्ये जाणं सोप्पं नाहीये. मला जास्त अपेक्षा नव्हत्या. आपणही करू शकतो, हे आपण सिद्ध करणं महत्त्वाचं असतं. हा आनंदाचा क्षण आहे. जबाबदारीची जाणीव आहे. ती वाढत आहे.

  • प्रश्न - राजू, तुम्ही भारतातील शिक्षण पद्धती पाहिली आहे. आता सध्या तुम्ही ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून तिथे शिक्षण घेत आहात. तिकडची शिक्षणपद्धती आणि भारतातील शिक्षणपद्धती यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?

उत्तर - महत्त्वाचा प्रश्न आहे. क्रिटिकल थिंकिंग यावर जोर आहे. मी भारतात टाटा इन्टिट्युटमध्ये शिकलो आहे. मात्र, इथला अप्रोच खूप चांगला आहे. भारतातील ज्या पारंपरिक विद्यापीठं आहेत, जसे की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अमरावती विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ. तुम्ही आयआयएमसीमध्ये शिकला आहात, आयआयएमसी आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यामधील फरक तुम्हाला जाणवला असेल. आयआयएमसी मधून तुम्ही लंडन किंवा अमेरिका येथील शिक्षणसंस्थेत गेलात तर तिथे तुम्हाला फरक जाणवेल. आपल्या विचारांना आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये वाव नाही. उदा. 2011मध्ये मी पुण्याला शिक्षणासाठी गेलो होतो तेव्हा मला माझ्या भाषेचा न्यूनगंड होता. इंग्रजीचं सोडा पण वैदर्भीय भाषेचाच मला न्यूनगंड होता. पुण्याची मराठी भाषा. भाषेवर आकलन (judge) केलं जातं. माझ्या कंटेंटला स्कोप नाही मिळाला, जे आपण आज एकलव्य संस्थेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय.

मला असं वाटतं की, इथं तुम्हाला तुमच्या कंटेंट, अनुभवाला वाव आहे. मला अजूनही पुरेसं इंग्रजी येत नाही. मात्र, काम करण्यापुरतं, स्वत:ला एक्सप्रेस करण्यापुरतं, जमतं. पण इंग्रजीवरून इथं कोणी जज करणार नाही. माझ्या ज्ञानाचा, कामाचा इथं सम्मान केला जातो. आपल्या शिक्षणप्रणालीमध्ये, कारकुनी व्यवस्था आहे. पाश्चिमात्य देश, युरोपीयन देशांमध्ये क्रिटिकल थिंकिंग हा बिंदू केंद्रस्थानी मानला जातो. उदा. माझं आरक्षणावर जर लेक्चर झालं तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त त्यावर संवाद (Discussion) होईल. त्यात शिक्षक नाही तर फक्त विद्यार्थी बोलणार. यातुलनेत आपल्याकडे वन-वे पद्धत आहे. मास्तर बोलणार आणि विद्यार्थी ऐकणार. प्रश्नोत्तरं फार ठराविक होतात. मात्र, इथं प्रश्नोत्तराचा विशेष तास होतो.

संशोधनाचा मुद्दा जर घेतला तर Research Innovation मध्ये पाहिजे त्या प्रमाणात invest करत नाही. स्कॉलरशिप परदेशात मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. मला जी स्कॉलरशिप मिळाली, ती मला अस वाटतं की ती भारत सरकारने द्यायला हवी होती. तोडक्या मोडक्या स्कॉलरशिप भारतात आहेत. म्हणजे मी ज्या भागातून येतो, तिथे आपल्याला बँक दोन लाखही कर्ज देऊ शकत नाही. त्यातुलनेत लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, इतरही विद्यापीठ असतील तिथे चीन, थायलंड तिथल्या विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिसतात. भारताचे विद्यार्थी हा elite culture चा आहे. ते इथे सहज येतात. किती विषमता आहे, higher education and inequality याबाबत मी संशोधनही करत आहे. Higher Education & Research Innovation यामध्ये शासनाने प्राथमिकता दिली पाहिजे. तरुणाई देशाचं भविष्य आहे. डॉ. कलाम सर सांगून गेले, भारत हा युवकांचा देश आहे. Academic, Research, Capacity Building असेल, त्यात investment झाली पाहिजे.

Chevening Scholar Raju Kendra Interview From London with ETV Bharat
राजू केंद्रे यांचा फोर्ब्स इंडिया कडून सन्मान.
  • प्रश्न - तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळाली, त्यासाठी तुम्ही एकलव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून जे काम केलं त्याची दखल घेतली गेली. तुमच्या एकलव्य फाऊंडेशनबद्दल सांगाल.

उत्तर - मला असं वाटतं की, 2011 मी पुण्यात गेलो होतो. आर्थिक कारणासह, काही कारणांमुळे मला पुणे सोडावं लागलं. आज 15 विद्यार्थी एकलव्यच्या माध्यमातून पुणे विद्यापीठात शिकताय. 10 वर्षांपूर्वी मी पुणे विद्यापीठ सोडलं आणि मला त्यानंतर मुक्त विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागला होता. मला त्याचा त्रास होतो की अॅकॅडमिक 3 वर्षाचा गॅप पडला. त्यावेळी मी फिल्डमध्ये पार ताकदीने शिकलो. असे हजारो लाखो विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षणासाठी शेकडो मैल जावं लागतं. त्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी त्यांची क्षमता वाढवण्यासाठी विविध संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जातंय. टाटा इन्स्टिट्यूट, जेएनयू, आयआयटी, आयआयएम यामधील जे काही development sectorचे कोर्सेस आहेत, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जातंय. शिक्षणाच्या सर्वच विषयात तळागाळातील नेतृत्त्व उभं राहिलं पाहिजे, यासाठी उच्च शिक्षण महत्त्वाचं आहे. उच्च शिक्षण हे नेतृत्त्व विकसित करतं. Forbes 30 Under 30, Chevening काय आहे? हे नेतृत्त्वाचं एक व्यासपीठ आहे. उच्च शिक्षणामुळे आज मी लंडनला टाटा इन्स्टिट्यूला किंवा फिल्डमध्ये जे शिकलो, त्यामुळे मी स्वत:मधील नेतृत्वगुण सिद्ध करू शकलो. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील नेतृत्त्व उभं राहावं, हा आमचा प्रयत्न आहे.

  • प्रश्न - तुम्ही लंडनमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर आता जे काम करत होता, त्यानंतर आता पुढे कशापद्धतीने काम करावं, यासाठी तुमचा काही रोडमॅप तयार आहे का?

उत्तर - हो. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. फोर्ब्सनंतर आता जबाबदारी वाढली आहे. फोर्ब्सचं recognsion आहे तर त्याला मी channelize करणार आहे. जे मला जगाच्या व्यासपीठावर मिळेल त्याचा फायदा मी आपल्या लोकांना करुन देणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली, भाऊसाहेब देशमुख असतील, बाबासाहेब असतील, peoples education society असेल, शिवाजी शिक्षण संस्था असेल, यासंस्थानंतर सामाजिक उद्देशाच्या माध्यमातून संस्था उभ्या राहिल्या नाहीत. यामुळे यांसारख्या Institution Builiding साठी मी माझे स्त्रोत, माझी ऊर्जा वापरणार आहे. एकलव्यला एक रचनात्मक स्वरुप यावं येत्या काळात, मध्य भारतात आदीवासी समाजात आजही शिक्षणाचं प्रमाण 10 टक्के आहे. त्या भागात एक चांगलं विद्यापीठ, त्याच्या माध्यमातून जगाच्या पातळीवर एक लीडरशिप उभी राहावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.

  • प्रश्न - राजू, तुम्ही ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्त्व करतात. ग्रामीण भागातून येऊन, मुक्त विद्यापीठातून येऊन, तुम्ही जागतिक स्तरावर गरुडझेप घेतली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणाईला तुम्ही काय सांगाल.

उत्तर - तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलात, मीदेखील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. तुम्ही आज एका व्यासपीठावर आहात. मी एका व्यासपीठावर आहे. तरुणांना एकच सांगेन की, काही अडचणी असतात, माझ्या स्वत:च्या आयुष्यात अनेक अपयश आले, तुमच्याही आयुष्यात अपयश आलं असेल, अडचणींना डगमगू नका. आपल्याला जे आवडतं त्यात Energy Invest करा. जिथं काही अडचण असेल तिथं राजू केंद्रे, एकलव्य, आपण सर्व आहोत. Pay Back to Society ही आपली सर्वांची जबाबदारी पण आहे. त्यामुळे निराश होऊ नका. राजू केंद्रे हे उदाहण आहे. मी काही पुण्या-मुंबईतून आलो नाही. भटक्या समाजातून आलोय. शेतकरी कुटुंबातून आलोय. त्यांना फोर्ब्स,चेवनिंग माहित नाही. मात्र, त्यांना त्यांच्या लेकराचा अभिमान आहे. तुमच्यातील potential ओळखून एका क्षेत्रात जर ठराविक काळासाठी तुम्ही स्वत:ला झोकून दिलं तर नक्कीच यश मिळेल, असं मला वाटतं. अडचणी असतील तर शेअर करा. हजार अडचणी असतात, माझं नाव फोर्ब्समध्य आलं म्हणजे सर्वकाही झालं असं होत नाही. हे माझ्या ध्यानीमनी नव्हतं. मी गेल्या 10 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतोय. हे भेटलं असतं, नसतं तरी मी माझं काम सुरू ठेवलं असतं. छोट्या प्रमाणावर का होईना मी माझं काम सुरुच ठेवलं असतं. त्यामुळे प्रामाणिकपणे जर मेहनत करत राहिलो तर मला वाटतं की यश नक्की मिळतं, यात काही शंका नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.