ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : 'सकाळी उठून भोंगा वाजवण्यापेक्षा....' - Chandrasekhar Bawankule critics in Buldhana

संजय राऊतांनी रोज सकाळी उठून भोंगा वाजवण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन चांगल्या सूचना केल्या तर बरे होईल, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असतील तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असेही त्यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule Critics
चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Jan 22, 2023, 6:12 PM IST

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांसोबत संवाद साधताना

बुलडाणा : खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दोघांमध्ये टीका-टिपण्णी सुरूच आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बुलढाण्यात आले असताना त्यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, रोज सकाळी उठून भोंगा वाजवण्यापेक्षा संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन चांगल्या सूचना केल्या तर बरे होईल, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.

महाराष्ट्राची संस्कृती : पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासापीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी शरद पवारांचे मार्गदर्शन घेतो असे वक्तव्य केले होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असतील तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. जे चांगलं आहे ते सर्वांनी स्वीकारले पाहिजे. शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे, जर ते काही त्या सूचना देत असतील तर सत्तेत असणाऱ्यांनी त्या सूचना स्वीकारण्याचे काम आहे, असेही ते म्हणाले.

सरकारला मार्गदर्शन करावे : ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र क्रमांकवर ठेवणे हीच सत्ताधाऱ्यांची भूमिका असते. विकासात्मक पद्धतीने मार्गदर्शन करणे ही विरोधकांची भूमिका आहे. सरकार जेथे चुकत असेल तेथे आवश्य टीका करावी पण दररोज सरकारवर टिपा-टिप्पणी करून टोमणे मारणे हे चुकीचे आहे. यामुळे सरकारला अशा पद्धतीने टीका न करता मार्गदर्शन करण्याचे काम विरोधकांनी केले पाहिजे.

संजय राऊतांची टीका : भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी पायी चालत पूर्ण करत आहेत. विरोधकांनी केवळ चार किलोमीटर तरी चालवून दाखवावे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज लगावला आहे.

हेही वाचा : Sharad Pawar in Pune : विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आजच्या तरुणाईला यश मिळेल - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.