बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यात क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या 54 परप्रांतीय मजुरांना पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. 9 मे) उघडकीस आली होती. या प्रकरणी गजानन चोपडे आणि बाळकृष्ण फुंडकर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तत्काळ पोलीस मुख्यालयी संलग्न केले आहे. तर खांमगावचे इंसिडेंट कमांड उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या अहवालावरुन 13 परप्रांतीयावर देखील खांमगाव शिवाजी नगर पोलीस ठाण्यात साथरोग कायद्यांंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या 54 परप्रांतीय मजुरांना खामगाव येथील वसतीगृहामध्ये 40 दिवसांपासून क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवसांपासून हे मजूर घरी जाण्यासाठी गोंधळ घालत होते. शुक्रवारी (दि. 8 मे) साडेअकराच्या सुमरास या मजुरांनी मध्यरात्री गोंधळ घातल्याने कर्तव्यावर असलेले गजानन चोपडे आणि बाळकृष्ण फुंडकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी सौम्य बळाचा वापर केला. या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी यासाठी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ मुख्यालयी संलग्न केले असून खांमगावचे इनसिडेंट कमांड उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या अहवालावरून आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग कायद्यानुसार 13 परप्रांतीय मजुरांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माजी आमदार सानंदा यांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर केली होती गुन्हे दाखल करण्याची मागणी
लाॅकडाऊनमध्ये पोलीस विभागाने चांगले काम करत असताना काही पोलीस कर्मचारी असे असभ्य वर्तन करत असल्याने पोलीस विभागाची प्रतीमा मलीन होऊ नये, यासाठी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केली शनिवारी (दि. 9 मे) घटनास्थळी पोहोचून केली होती. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांवर नाही तर 13 परप्रांतीय मजुरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - दिलासादायक..! बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त, आतापर्यंत सर्व २३ रूग्णांना डिस्चार्ज
बुलडाणा : 'ते' दोन पोलीस कर्मचारी मुख्यालयी संलग्न, 13 परप्रांतीयांवर गुन्हे दाखल
क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या 54 परप्रांतीय मजुरांना पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण प्रकरणी या प्रकरणी गजानन चोपडे आणि बाळकृष्ण फुंडकर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तत्काळ पोलीस मुख्यालयी संलग्न केले आहे. तर 13 परप्रांतीयांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.