बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील सीएससी सेंटर चालकांनी शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवला. मात्र, शेकडो शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कमच विमा कंपनीत भरली नाही. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. दरम्यान, शेतकरी संघटनेना आणि शेतकऱ्यांनी सिएससी सेंटर चालक धीरज चांडक आणि केतन चांडक यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी तांमगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
रमेश बानाईत यांची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बनाईत यांच्यासह शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रार नुसार, पातुर्डा येथील सीएससी सेंटरचे चालक धीरज चांडक आणि केतन चांडक यांनी जुलै 2018 रोजी शेतकऱ्यांचे पीक विमा उतरविला होता. मात्र, दुष्काळग्रस्त शेकडो शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. याचे कारण असे की, सीएससी सेंटरचे चालक धीरज चांडक आणि केतन चांडक यांनी शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसेच कंपनीकडे भरले नाही. दरम्यान, खरीप पिकाचा २०१८ मधील विमा देखील विमा कंपण्यांकडे जमा केला नाही. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली तक्रार पोलिसांत दाखल करणयात आली आहे.
हेही वाचा - भाजपच्या नवनिर्वाचित 105 आमदारांची 'वसंत स्मृती' येथे बैठक