ETV Bharat / state

वाघिणीच्या शोधात तब्बल 1700 किमीचा प्रवास; C-1 वाघाची अंजिठ्याकडे कूच - बुलडाणा वन्यविभाग

वाघिणीच्या शोधासाठी टिपेश्वर अभयारण्यातून 1300 किमीचा प्रवास करत बुलडाणा नजीक ज्ञानगंगा अभयारण्य गाठणाऱ्या सी-1 वाघाने आता आपला मोर्चा अजिंठ्याकडे वळवला असल्याची माहिती समोर आली आहे.

c-1-tiger-travels-for-seventeen-hundred-km-in-search-of-a-tigeress
सी-1 वाघाचा वाघिणीच्या शोधात तब्बल सतराशे किमीचा प्रवास
author img

By

Published : Dec 28, 2019, 11:54 AM IST

Updated : Dec 28, 2019, 12:19 PM IST

बुलडाणा - वाघिणीच्या शोधासाठी टिपेश्वर अभयारण्यातून 1300 किमीचा प्रवास करत बुलडाण्याजवळचे ज्ञानगंगा अभयारण्य गाठणाऱ्या C-1 वाघाने आता आपला मोर्चा अजिंठ्याकडे वळवला असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या वाघाने 1700 किलोमीटर इतका लांब प्रवास केल्याची माहिती बुलडाणा वन्यजीव विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे इतका लांब पायी प्रवास करणारा हा राज्यातला पहिलाच वाघ असल्याचे सांगण्यात येत आहे.

सी-1 वाघाचा वाघिणीच्या शोधात तब्बल सतराशे किमीचा प्रवास

हेही वाचा - सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल

सी-1 नावाच्या वाघाने 1300 किमीचे अंतर पार करत टिपेश्वर अभयारण्यावरून ज्ञानगंगा अभयारण्य गाठले. वाघाचा हा अचंबीत करणारा 5 महिन्याचा प्रवास वाघिणीच्या शोधात असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे 205 चौकिमी क्षेत्र असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यमध्ये तो काही काळ होता. त्यानंतर आता तो अजिंठ्याकडे निघून गेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात T-1 या वाघिणीने 2016 मध्ये C-1, C-2 आणि C-3 अशा तीन पिल्लांना जन्म दिला होता. यातील C-1 हा वाघ महाराष्ट्र व तेलंगाणा हे दोन राज्य व महाराष्ट्रातील 6 जिल्हे फिरून 5 महिन्यात 1300 किमीचे अंतर पार करत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला होता. या तीनही वाघांना मार्च 25 आणि 27 मार्च 2019 दरम्यान रेडिओ कॉलर लावण्यात आले असून वाघांचे परिक्रमण तपासण्याच्या दृष्टीकोनातून ही बाब महत्वपूर्ण ठरली आहे.

1300 किलोमीटरची अशी सफर करणाऱ्या सी-1 वाघाने अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या 205 चौरस किलोमीटरमध्ये विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्य पिंजून काढले. वाघ हे अभयारण्य सोडून अजिंठा पर्वत रांगेत असलेला जालना जिल्हा ओलांडून औरंगाबाद किंवा जळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्याची तयारीत आहे. अर्थातच हा सगळा प्रवास अधिवासासह वाघिणीच्या शोधात सुरू आहे. C-1 वाघाने आता पर्यंत 1700 किलोमीटरचा प्रवास केला आहे व वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, देहरादूनचा एक चमू रेडियो कॉलरच्या मदतीने या वाघाच्या मागावार असून त्याच्या हालचालीवर पूर्ण लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा - एकतर्फी प्रेम करणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

Intro:Body:बुलडाणा: - स्वतंत्र अधिवास अन् वाघिनीच्या शोधासाठी टिपेश्वर अभयारण्यातून 1300 कि.मी.चा प्रवास करत बुलडाणा नजीक ज्ञानगंगा अभयारण्य गाठणाऱ्या सी-1 वाघाने आता आपला मोर्चा अजिंठ्याकडे वळवला असल्याची माहिती समोर आली आहे.तर आता पर्यंत या वाघाने 1700 किलोमीटर इतका लांब प्रवास केल्याची माहिती बुलडाणा वन्यजीव विभागाने दिली आहे.विशेष म्हणजे इतका लांब पायी प्रवास करणारा हा राज्यातला पहिलाच वाघ असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सी-1 नावाच्या सबअडल्ट वाघ 13 शे कि.मी.चे अंतर पार करत टिपेश्वर अभयारणय वरुन ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला. वाघाचा अचंबीत करणारा 5 महिन्यातला हा प्रवास मादी वाघाच्याच शोधात झाला. विशेष म्हणजे 205 चौ.कि.मी. क्षेत्र असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यमध्ये या वाघोबाला संरक्षीत जीवन मिळण्याची शक्यता अधिक असतांना वाघिनीचे नसने त्याच्या थांबन्याला आडकाठी ठरले. C-1 वाघ मात्र 15 दिवस इथे थांबुन अजिंठा पर्वत रांगेत अर्थात अजिंठ्याकडे निघुन गेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात टी-1 या वाघिणीने 2016 मध्ये सी-1, सी-2 आणि सी-3 अशा तीन पिल्लांना जन्म दिला होता. यातील सी-1 हा वाघ महाराष्ट्र व तेलांगाना हे दोन राज्य व महाराष्ट्रातील 6 जिल्हे फिरून 5 महिन्यात 1 हजार 300 कि.मी.चे अंतर पार करत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पोहचला होता. या तीनही वाघांना मार्च 25 आणि 27 मार्च 2019 दरम्यान रेडीओ कॉलर लावण्यात आले असून वाघांचे परिक्रमण तपासण्याच्या दृष्टीकोणातून ही बाब महत्वपूर्ण ठरली आहे.
13 शे किलोमीटरची अशी सफर करणाऱ्या सी-1 वाघाने अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या 205 चौरस किलोमीटर मध्ये विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्य पिंजुन काढले व आता हे अभयारणय सोडून अजिंठा पर्वत रांगेत असलेला जालना जिल्हा ओलांडून औरंगाबाद किंवा जळगांव जिल्ह्यात प्रवेश करण्याची तयारीत आहे. अर्थातच हा सगळा प्रवास अधिवासासह वाघिनीच्या शोधात सुरु आहे, सी-1 वाघाने आता पर्यंत 1700 किलोमीटरचा प्रवास केला आहे व वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया,देहरादून चा एक चमु रेडियो कॉलरच्या मदतीने या वाघाच्या मागावार असून त्याच्या हालचालीवर पूर्ण लक्ष ठेवलं जातं आहे.

बाईट - मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी,वन्यजीव विभाग, बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Dec 28, 2019, 12:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.