ETV Bharat / state

बुलडाण्यात कोणाच्या हाती सत्तेची चावी? 24 ऑक्टोबरला होणार फैसला

बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. सातही मतदासंघांमध्ये चुरशीची लढत होत असल्याने मतदानाची टक्केवारी पाहता विजय कोणाचा, याबाबत चांगल्याच राजकीय चर्चा रंगली होती. त्यासंबंधित जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील 2014 आणि 2019 ची विधानसभा निवडणूक, त्यातील बदल, निवडणुकीतील परिस्थितीचा आढावा...

Buldana district assembly elections 2019
author img

By

Published : Oct 23, 2019, 3:11 PM IST

बुलडाणा - राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान झाले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली होती. यावेळेस जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणूकीत 66.40 टक्के मतदान झाले होते. यावेळेस 64 टक्के मतदान झाले आहे. म्हणजे काही प्रमाणात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.

Buldana district assembly elections 2019
बुलडाण्यात कोणाच्या हाती सत्तेची चावी? 24 ऑक्टोबरला होणार फैसला...

या जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. सातही मतदासंघांमध्ये चुरशीची लढत होत असल्याने मतदानाची टक्केवारी पाहता विजय कोणाचा, याबाबत चांगल्याच राजकीय चर्चा रंगली होती. त्यासंबंधित जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील 2014 आणि 2019 ची विधानसभा निवडणूक, त्यातील बदल, निवडणुकीतील परिस्थितीचा आढावा.

2014 ची आकडेवारी -
भाजप - 3
शिवसेना - 2
राष्ट्रवादी - 0
काँग्रेस - 2
इतर - 0

हेही वाचा - जळगावात कोण राखणार गड? उत्सुकता शिगेला...

मलकापूर - या मतदारसंघात 2014 ला 66.40 % मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 67 % टक्के असून टक्का वाढला आहे. मागील वेळी इथून भाजपचे चैनसुख संचेती यांनी काँग्रेसचे अरविंद कोलते यांनी पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी पु्न्हा एकदा भाजपकडून चैनसुख संचेती हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरूद्ध काँग्रेसचे राजेश एकडे हे निवडणूक लढत आहेत.

बुलडाणा - या मतदारसंघात 2014 ला 60.1% मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 57% असून टक्का घसरला आहे. मागील वेळी इथून काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेचे संजय गायकवाड यांचा पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्याविरूद्ध पुन्हा एकदा काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

चिखली - या मतदारसंघात 2014 ला 68 % मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 65% असून टक्का घसरला आहे. मागील वेळी इथून काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहूल बोंद्रे यांनी भाजपचे सुरेश खबुतरे यांचा पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी भाजपच्या श्वेता महाले निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरूद्ध काँग्रसचे राहुल बोंद्रे निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा - माजी आमदार अनिल गोटे मतमोजणीपर्यंत देणार ईव्हीएम मशीनजवळ पहारा

सिंदखेड राजा - या मतदारसंघात 2014 ला 64.74% मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 64% असून टक्का सरासरी राहिला आहे. मागील वेळी इथून शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर यांनी भाजपचे डॉ. शशिकांत मंटे यांचा पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरूद्ध राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

मेहकर - या मतदारसंघात 2014 ला 59.80 % मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 62% असून टक्का वाढला आहे. मागील वेळी इथून शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर यांनी काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांचा पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेकडून संजय रायमूलकर यांच्याविरूद्ध काँग्रेसचे अनंत वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

खामगाव - या मतदारसंघात 2014 ला 73.91% मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 72% असून टक्का कमी झाला आहे. मागील वेळी येथून भाजपचे आकाश फुंडकर यांनी काँग्रेसचे दिलीप सानंदा यांचा पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी पुन्हा भाजपचे आकाश फुंडकर हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरूद्ध काँग्रेसचे ज्ञानेश्वर गणेश हे निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा - सिद्धूंच्या पत्नीने दिला काँग्रेसचा राजीनामा

जळगाव(जामोद) - या मतदारसंघात 2014 ला 72.58% मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 70% असून टक्का वाढला आहे. मागील वेळी इथून भाजपचे डॉ. संजय कुटे यांनी भारिप बहुजन महासंघाचे प्रसनजीत तायडे यांचा पराभव केला होता. याठिकाणी पुन्हा एकदा डॉ. संजय कुटे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचे आवाहन आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजही हा जिल्हा मात्र, विकासापासून आजही वंचितच आहे. पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही, त्यामुळे राज्यातील एक मागासलेला जिल्हा म्हणून बुलडण्याची ओळख आहे. तर आता जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील 59 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत कैद झाले आहे. मतदार आता पुन्हा कोणाच्या हाती सत्तेची चाबी देतात, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर गुरूवारी 24 ऑक्टोबरला लागणाऱ्या निकालात या सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.