बुलडाणा - बुलडाणा जिल्हा उपनिबंधक पदावर कार्यरत असणारे महेंद्र चव्हाण यांची अमरावती प्रादेशिक उपसंचालक (साखर) रिक्त पदावर बदली करण्यात आली. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव म.ग.जोशी यांनी 9 मार्च रोजी बदलीचे आदेश निर्गमित केले. 9 मार्चपासून 11 मार्चपर्यंत जिल्हा उपनिबंधकाचा पदभार न सोडल्यामुळे शुक्रवारी 12 मार्चच्या संध्याकाळी पर्यंत कार्यमुक्त होवून सध्याचा प्रभारी पदभार साहाय्यक उपनिबंधक आर.एल.राठोड यांना देण्याचा आदेश शुक्रवारी 12 जानेवारीला अमरावतीच्या सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांनी बुलडाणा जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
20 महिन्याच्या कार्यकाळानंतर बदली-
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उपनिबंधक पदावरून महेंद्र चव्हाण हे बदलून बुलडाणा जिल्हा उपनिबंधक पदावर ऑगस्ट 2019 रोजी बुलडाण्यात रुजू झाले होते. तेव्हा पासुन ते बुलडाण्यात कामकाज करीत होते. त्यांच्या कार्यकाळ सावकारांच्या विरोधात अनेक तक्रारींच्या निराकरण करण्यात आले नाही. अनेक तक्रारी त्यांच्या कार्यकाळात निकाली काढल्या गेल्या नाहीत. दरम्यान 20 महिन्याच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली अमरावती येथील प्रादेशिक उपसंचालक (साखर) या रिक्त पदावर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव म.ग.जोशी यांनी 9 मार्च रोजी केली आहे.
मात्र, 9 मार्च रोजी बदली करण्यात आली असतांना महेंद्र चव्हाण कार्यमुक्त झाले नाहीत. त्यामुळे 12 मार्चच्या संध्याकाळपर्यंत कार्यमुक्त होवून सध्याचा प्रभारी पदभार साहायक उपनिबंधक आर.एल.राठोड यांना देण्याचा आदेश शुक्रवारी 12 जानेवारीला अमरावतीच्या सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांनी बुलडाणा जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना दिले आहेत.
कार्यमुत होण्याच्या दिवशी सावकाराच्या दोन सुनावणी-
बदली झाल्यानंतर कार्यमुत होण्याच्या शुक्रवारी 12 मार्चच्या दिवशी जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी मेहकर तालुक्यातील दोन सावकारांच्या विरोधात झालेल्या तक्रारींच्या सुनावणी घेतल्या. ही सुनावणी घेतांना संपूर्ण कार्यालयात चर्चा होती की, सुनावणी घेण्यात आलेल्या तक्रारीपेक्षा जुन्या तक्रारी प्रलंबित असून त्या प्रलंबित तक्राऱ्यांच्या सुनावणी घेतली गेली नाही. फक्त मर्जीतील तक्रारींची सुनावणी घेण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.
आंदोलनात मारहाण झाल्याने चर्चेत आले होते महेंद्र चव्हाण-
बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षापासून बंद असल्याने तिथे काम करणाऱ्या 700 साखर कामगारांचे वेतन अनेक वर्षापासून पासून रखडलेले आहे. वेतन दिल्यासंबंधी कारखान्यातील साखर विकलेल्या रकमेतून सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर वेतन देण्याचा मार्ग मोकळा झाला असतांनाही कामगारांना जवळपास 3 कोटी 75 लक्ष थकीत वेतन मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयासमोर कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान दुपारी बैठकीला जात असलेल्या जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना कामगारांनी लोटपाट करून मारहाण केल्याची घटना घडली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे महेंद्र चव्हाण चर्चेत आले होते.
हेही वाचा- लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हॉटेल चालकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा अखेरचा इशारा