बुलडाणा - कोरोना वाढता पार्दुभाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी आणि सोमवारी सकाळीपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवले असले तरी सर्व आस्थापनांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे सध्या जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नागरिकांनी नियम पाळले तर ही परिस्थिती आणखी बदलू शकते.
सोमवारी 1 मार्चला सकाळी संपणारा लॉकडाऊन आता एका आठवड्यासाठी वाढविण्यात आला आहे. त्याचे आदेश आज (रविवारी) 28 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी एस.रामामुर्थी यांनी काढले. या आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, त्यानंतर संचारबंदी असणार आहे. मास्क वापरणे, हात धुणे तसेच सॅनिटाईझरचा वापर बंधनकारक राहील.
हेही वाचा - उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परिक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार
आदेशात सूट -
■ दूध विक्रेत्यांना पूर्वीप्रमाणेच सूट राहील.
■ विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक आणि व्यायामाला परवानगी राहील.
■ अंत्यसंस्काराला केवळ 20 जणांना तर तर विवाहाला 25 जणांना अनुमती राहील.
■ हॉस्पिटल, मेडिकल 24 तास सुरू राहतील.
■ वाहतुकीचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील.
■ सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालय बंद राहतील.
■ हॉटेल, रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेसह दिवसभर परवानगी. राहिल. तर संध्याकाळी पार्सल सुविधा देता येईल.