बुलडाणा - ड्रग्ज प्रकरणात नावे समोर आलेल्या सिनेकलाकारांनी निर्दोष मुक्तता होईपर्यंत आपल्याला मिळालेले सर्वोच्च पुरस्कार परत करावे. अन्यथा, ह्या कलाकारांना राष्ट्रीय ड्रग्ज भूषण पुरस्कार देण्यात येतील, असा इशारा आझाद हिंद संघटनेकडून करण्यात आल्याची बातमी ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. दरम्यान, रोठे यांनी अद्याप कोणत्याही सिनेकलाकाराने आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिला नसल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी पद्मश्री पुरस्कार परत देण्यासंदर्भात जनतेचा कौल घ्यावा, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.
हेही वाचा - सलमान खानने केक कापून वाजिद खानच्या आठवणींना दिला उजाळा
ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्या ज्या सिनेकलाकारांची नावे आली आहेत, त्यातील काही कलाकारांना देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, जोपर्यंत ड्रग्ज प्रकरणातून ह्या कलाकारांची निर्दोष मुक्तता होत नाही. तोपर्यंत ह्या सर्व कलाकारांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार परत करावे. अन्यथा, आझाद हिंद संघटनेकडून या कलाकारांना राष्ट्रीय ड्रग्ज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतील आणि या कलाकारांच्या चित्रपटांचे प्रदर्शन देखील थांबविण्यात येईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष सतिशचंद्र रोठे यांनी केले होते.
हे कलाकार पुरस्कार परत करणार का, त्यावर जनता आता काय कौल देते, हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौत ड्रग्ज घेते का, याबाबत मुंबई पोलीस तपास करणार असल्याच्या चर्चा माध्यमातून ऐकायला मिळाल्या होत्या.
हेही वाचा - बेनाडिक्टच्या चाहत्यांसाठी खुशखबर; स्पायडरमॅन-३ मध्येही दिसणार 'डॉ. स्ट्रेंज'