ETV Bharat / state

परीक्षा रद्द करून राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे बंद करावे - श्वेता महाले

एमपीएससी परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर आली असताना अचानक ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यभर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. यामुद्द्यावरून भाजप आमदार श्वेता महाले यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Shweta Mahale
श्वेता महाले
author img

By

Published : Mar 12, 2021, 8:16 AM IST

बुलडाणा - तोंडावर आलेली एमपीएससीची पूर्व परीक्षा रद्द करून सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप चिखली मतदान संघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्यादृष्टीने विचार करून परीक्षा घ्याव्यात, असे आवाहन महाले यांनी केले.

भाजप आमदार श्वेता महाले यांनी राज्य सरकारवर टीका केली

कोरोना महामारी, लॉकडाऊन यामुळे अगोदरच बेरोजगारी वाढलेली आहे. अशातच पुन्हा एकदा राज्य सरकारने कुठलीही पूर्व सूचना न देता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न केले आहे. चिखली मतदारसंघातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून एमपीएससीची तयारी करत आहेत. ही परीक्षा पुढे ढकलल्यास काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपेल. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा अंत न पाहता तत्काळ आपला निर्णय मागे घ्यावा आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार कोवीडचा प्रोटोकॉल पाळून एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.

चिखतील महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध -

रविवारी (14 मार्च 2020) होणारी एमपीएससी परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी गेल्या एक-दोन वर्षांपासून एमपीएससीची तयारी करत आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच त्यांच्या भविष्याच्या विचार न करता ही परीक्षा पुढे ढकलली आहे. सरकार कोरोनाच्या नावाने परीक्षा पुढे ढकलत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारमधील मंत्र्यांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळत आहे. तिथे गर्दी होत आहे. हे सगळं होत असतांना एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नोकरीचे वय देखील निघून जात आहे. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून आघाडी सरकार विद्यार्थ्यांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात गुरुवारी चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सागर पुरोहित, विजय वालेकर, सचिन कुलवंत, शंकर देशमाने, अक्षय भालेराव, सरचिटणीस सचिन कोकाटे, शंकर रुद्राकर, आयुष कोठारी, चैतन्य जोशी, प्रतीक पठ्ठे, प्रकाश पलभर, सुमित शिरसाट, गणेश लहाने, सागर घाडगे, तुषार राजपूत, प्रशांत जाधव, सतीश भुजबळ, अरविंद तोडकर यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.