बुलडाणा - जिल्ह्यातील चिखली येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार तसेच जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे हे भाजप प्रवेश करत असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. आमदार राहुल बोन्द्रे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विरोधात भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी चिखली येथे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना भाजप प्रवेश नको, अशा घोषणा देऊन राहुल बोन्द्रेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केला.
हेही वाचा - धक्कादायक! दूषित पाण्याने १० हजार लोकांचे जीव धोक्यात, कंपनी पेटवून देण्याचा ग्रामस्थांचा इशारा
भाजपने देशात व राज्यात मेगा भरती सुरू केली आहे. विविध पक्षांच्या आमदार, खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्याच धर्तीवर चिखली येथील काँग्रेस आमदार राहुल बोन्द्रे हे चिखली विधानसभेची उमेदवारी देण्याच्या अटींवर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना चिखलीतून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपने राहुल बोन्द्रे यांना उमेदवारी दिली, तर ज्या 16 ते 17 इच्छुक लोकांनी उमेदवारी मागितली आहे, त्यांच्यावर अन्याय होईल, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे भाजपच्या निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
हेही वाचा - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार