बुलडाणा - कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. मात्र, बुलडाण्याच्या मेहकर शहातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखे समोर नागरिकांनी मोठी गर्दी करत सामाजिक अंतराचा फज्जा उडवत होते. यावर ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्याची नजर पडताच बँक प्रशासनाला जाग आली. त्यानी लगेचच चुन्याने बँकेबाहेर सुरक्षित अंतर ठेवत वर्तुळ तयार केले. त्या वर्तुळात नागरिकांना शारीरिक अंतर ठेवत उभे केले.
कोरोनामुक्त झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा जळगांव जामोद मध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याचा प्रकार सोमवारी (दि.11 मे) उघडकीस आला आहे. शासनाच्या सुचनांचे पालन न करता हा रुग्ण मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाऊन आला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाली. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे कडक पाल पालन व्हावे, अशा शासनाकडून सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मेहकर येथील विदर्भ कोकण ग्रामीण व सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच बँकांनी शासनाच्या या नियमांची पायमल्ली क्याचे चित्र पहायला मिळाले.
हेही वाचा - बुलडाण्यातून 162 परप्रांतीय मजुरांची 'लालपरी'ने घरवापसी