ETV Bharat / state

धक्कादायक! दूषित पाण्याने १० हजार लोकांचे जीव धोक्यात, कंपनी पेटवून देण्याचा ग्रामस्थांचा इशारा - रणथम गाव बातमी

दसरखेड येथील बॅन्जो केमिकल फॅक्ट्रीतील रसायन मिश्रित पाण्याने परिसरातील १० हजार नागरिक प्रभावित झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी रसायनयुक्त पाण्याची तत्काळ विल्हेवाट न लावल्यास कंपनी पेटवून देण्याचा इशारा दिला आहे.

बॅन्जो केमिकल फॅक्ट्री
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:17 PM IST

Updated : Sep 26, 2019, 4:30 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसीमधील काही उद्योगांमुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॅन्जो केमिकल फॅक्ट्रीमधील विषारी रसायनयुक्त पाणी बाजूच्याच एका मोठ्या बंधाऱ्यात सोडले जात असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत. या भागातील ७ गावांमधील जवळपास १० हजार नागरिक देखील प्रभावित झाले आहेत. मात्र, या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण मंडळ साफ डोळेझाक करत आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष होत असल्याने आता नागरिकांनीच कंपनीविरुद्ध लढा उभारला आहे. या केमिकल फॅक्ट्रीच्या रसायनयुक्त पाण्याची तत्काळ विल्हेवाट न लावल्यास कंपनी पेटवून देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

धक्कादायक! दूषित पाण्याने १० हजार लोकांचे जीव धोक्यात, कंपनी पेटवून देण्याचा ग्रामस्थांचा इशारा

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असलेल्या दसरखेड एमआयडीसीमधील बॅन्जो केमिकल फॅक्ट्रीने रासायनिक पाणी नाल्यात सोडले. ते पाणी रणथम गावाजवळील पाझर तलावात पोहोचल्याने तलावातील पाणी दूषित झाले आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या भागातील काही ग्रामस्थांना अॅलर्जी, खाजेचे प्रकार, अंगावर फोड येणे यासह विविध आजाराने ग्रासले आहेत. शिवाय या रसायनयुक्त पाण्याचा सर्वात मोठा प्रभाव तलावातील माशांवर झाला आहे. हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तसेच या तलावाचे पाणी प्यायल्याने १८ बकऱ्या, ३ म्हशी, २ बैल आणि एक गाय मरण पावली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

कंपनीने यापूर्वीसुद्धा परिसरात रसायनयुक्त विषारी पाणी सोडल्याने १० किमी च्या परिसरातील गावांमधील बोअरवेल आणि विहिरींचे पाणी तेलयुक्त झाले होते. याबाबत परिसरातील गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र, प्रशासन आणि प्रदुषण मंडळ याविषयावर मुग गिळून बसले होते. या गंभीर प्रकाराला प्रसिद्धी माध्यमांनी उचलून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली. यानंतर सदर घटनेची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रदुषण मंडळाला पत्रव्यवहार करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - मौर्यकालीन प्राचीन भोन-बौद्ध स्तुप नष्ट करण्याच्या प्रयत्नात सरकार; बौद्ध बांधवांचा विरोध

सध्या या केमिकल फॅक्ट्रीच्या ५ किमी अंतरात असणाऱ्या रणथम या गावासह ७ गावातील १० हजाराच्या जवळपास नागरिक प्रभावित झाले आहेत. ज्या तलावात सध्या हे विषारी पाणी पोहचले आहे, त्या तलावाचे पाणी पुढे पूर्णा नदी पात्रात जाते. त्याच पात्रातून पुढे 22 गावांसाठी पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक योजना कार्यान्वित असून या विषारी पाण्यामुळे दसरखेड, विवरा, तांदुळवाडी, तालसवाडा, धरणगाव, कुंड बुर्ज, कुंड खुर्द, रणथम, शिवनी, निंबोळी, तिघ्रा,भानगुरा, दुधलगाव, रणगांव, वाघोळा, नवीन दुधलगाव, चिंचोल, देवधाबा, गोराड, हिंगणा काजी, भालेगाव ,खडकी, चिखली आदी गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येणार असल्याची शंका व्यक्त होत आहे. याप्रकरणी प्रशासन कुठलीही कारवाई करत नसून केमिकल कंपनीला वेळोवेळी सांगून कंपनी देखील दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे, आता नागरिकांनीच या बॅन्जो केमिकल फॅक्ट्री विरुद्ध एल्गार पुकारला आहे. या रसायनयुक्त पाण्याची तत्काळ विल्हेवाट न लावल्यास ही कंपनी पेटवून देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तर, या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - बुलडाण्यात विक्रमी मान्सून ; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

Intro:Body:बुलडाणा: - जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी मधील काही उद्योगामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... बॅन्जो केमिकल फॅक्ट्री मधील विषारी रसायनयुक्त पाणी बाजूच्याच एका मोठ्या बंधाऱ्यात सोडल्या जात असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे जनावरे मृत्यूमुखी पडत असून या भागातील ७ गावांमधील जवळपास १० हजार नागरिक प्रभावित झालीय... त्यांना खरुजासह विविध रोगांची लागणसह होत आहे.. मात्र या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण मंडळ लक्ष देत नसून हे झोपा काढीत आहेत कि काय ? असा प्रश्न हि विदारक स्थिती पाहल्यानंतर उपस्थित होतोय... प्रशासन कुठली हि कारवाई करीत नाही आणि केमिकल कंपनीला वेळोवेळी सांगून न हि त्यावर उपाय योजना होत नसल्याने आता नागरिकांनीच कंपनी विरुद्ध एल्गार पुकारलाय... या रसायनिक युक्त पाण्याची तात्काळ विल्हेवाट न लावल्यास कंपनी पेटवून देण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिलाय...

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असलेल्या दसरखेड एमआयडीसी मधील बॅन्जो केमिकल कंपनी ने रासायनिक युक्त पाणी नाल्यात सोडले आणि ते पाणी रणथम गावाजवळील पाझर तलावात पोहोचल्याने तलावातील पाणी दुषित झाले असून या दूषित पाणीमूळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेय.....यामुळे काही ग्रामस्थांना ईजा पोहचल्या असून अँलर्जी, खाजेचे प्रकार, अंगावर फोड येणे या सह विविध आजारने या भागातील नागरिकांना ग्रासलेय... शिवाय या केमिकलयुक्त पाण्याचा सर्वात मोठा प्रभाव तलावातील माश्यावर झालेला असून हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत... तर या तलावाचे पाणी पिणारी जनावरे ज्यामध्ये १८ बकऱ्या ३ म्हशी, २ बैल आणि एक गाय हि मरण पावली असल्याचे ग्रामस्थांचा आरोप असून ग्रामस्थानी केलाय .. तर या विषारी पाण्यामुळे जनावरांचे डोळ्यांना ईजा ही होत आहेत...

बाईट - अनंथा बोदडे, त्रस्त ग्रामस्थ..
बाईट - त्रस्त नागरिक..

या कंपनीने याआधी सुद्धा परिसरात केमिकलचा विषारी पाणी बोअर वेल मध्ये सोडल्याने १० कि.मी च्या परिसरातील गावांमधील बोअरवेल आणि विहिरी चे पाणी तेलयक्त झालेले असून प्रदूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे... परिसरातील गावकऱ्यांनी या बाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या मात्र प्रशासन आणि प्रदूषण मंडळ याविषयावर मात्र मुग गिळून बसलेय.. जेव्हा या गंभीर प्रकाला प्रसिद्धी माध्यमांनी ग्रामस्थांवरील अन्यायाबाबत प्रशासनाला जाब विचारले तेव्हा मात्र घटनास्थळाचा पंचनामा केला असून तातकाक चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिलेय .. शिवाय प्रदूषण मंडळाला ही पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले .. . .

बाईट - स्वप्नाली डोईफोडे, तहसीलदार, मलकापूर..

सध्या या केमिकल कंपनीच्या ५ कि.मी अंतरात असणाऱ्या रणथम या गावासह ७ गावातील १० हजाराच्या जवळपास नागरिक प्रभावित झालेले असून ज्या तलावात सध्या हे विषारी पाणी पोहचले आहे. त्या तलावाचे पाणी पुढे पूर्णा नदी पात्रात जात असल्याने आणि त्याच पात्रातून पुढे 22 गावांसाठी पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक योजना कार्यान्वयीत असून या विषारी पाण्याचा धोका दसरखेड, विवरा, तांदुळवाडी, तालसवाडा, धरणगाव, कुंड बु!!, कुंड खुर्द, रणथम, शिवनी, निंबोळी, तिघ्रा,भानगुरा, दुधलगाव, रणगांव, वाघोळा, नवीन दुधलगाव,चिंचोल, देवधाबा,गोराड, हिंगणा काजी, भालेगाव ,खडकी, चिखली आधी गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येणार असल्याची शंका व्यक्त होत आहे... प्रशासन कुठली हि कारवाई करीत नाही आणि केमिकल कंपनीला वेळोवेळी सांगून हि त्यावर उपाय योजना होत नसलायेन आता नागरिकांनीच या बेंजो केमिकल कंपनी विरुद्ध एल्गार पुकारलाय... या रसायनिक युक्त पाण्याची तात्काळ विल्हेवाट न लावल्यास कंपनी पेटवून देण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिल्याने एकच खळबळ उडालीय ..

बाईट - उल्हास डोमळे, ग्रामस्थ, रणथम ..

नागरिकांच्या जीवन माणशी निगडित असलेल्या या गंभीर विषयाकडे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने तात्काळ पावले उचलने गरजेचे आहे.. कंपनीचे विष युक्त पाणी नदी पात्रात जात असल्याने आणि या नदीवर अनेक पेयजल योजना अस्तित्वात असल्यानं हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेय.. प्रशासनाच्या वेळकाढू पणामुळे या भागातील नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहाणार नाही, एव्हढे मात्र खरे....

-वसीम शेख,बुलडाणा-

स्टोरी मध्ये खूप प्रमाणात विजवल्स आहे.आपल्याप्रमाणे विजवल्स घेणे...मोठी बातमी आहे.कृपया पैकेज करावी...Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.