ETV Bharat / state

नऊ एकरमधील तुरीच्या गंजीला आग, स्प्रिंकलर पाईपसह कांद्याची चाळ जळून खाक

नऊ एकर शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना खामगाव तालुक्यात समोर आली आहे. या घटनेत पाच ते सहा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

an-unknown-person-set-fire-to-the-turis-pikal-on-bulldana
नऊ एकर मधील तुरीच्या गंजीला अज्ञाताने लावली आग, स्प्रिंकलर पाईप सह कांदा चाळ जळून खाक
author img

By

Published : Feb 15, 2020, 12:18 PM IST

बुलडाणा - नऊ एकर शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञाताने आग लावल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शनिवारी 15 फेब्रुवारीच्या रात्री दोनच्या सुमारास घडली. यामध्ये शेतकऱ्याच्या स्प्रिंकलर चे पाईप, कांदा शेळ देखील जळून खाक झाले. या घटनेत शेतकऱ्यांचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नऊ एकर मधील तुरीच्या गंजीला अज्ञाताने लावली आग, स्प्रिंकलर पाईप सह कांदा चाळ जळून खाक

खामगाव तालुक्यातील बोरीआडगाव येथील शेतकरी नारायण टिकार यांनी नऊ एकरातील तुरीची सोंगणी करून कांदा शेड जवळ आपली सुडी लावून ठेवली होती. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने कांदा शेड संपूर्ण जळाले आहे. जनावरांचा चारा व शेती उपयोगी साहित्य देखील जळले आहे. हा प्रकार आज शनिवारी 15 फेब्रुवारीच्या समोर आला. आगीत संपूर्ण तूर जळून खाक झाली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.