ETV Bharat / entertainment

अ‍ॅक्शन, रोमान्स, इमोशन्सनी भरपूर समित कक्कड यांचा नवा चित्रपट ‘रानटी’ - MARATHI MOVIE RANTI

Marathi movie Ranti : 'रानटी' हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक पॉवरफुल पॅकेज असल्याचा दावा दिग्दर्शक समित कक्कड यांनी केलाय. हा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय.

Samit Kakkad's new movie Ranti
समित कक्कड यांचा नवा चित्रपट ‘रानटी’ (Samit Kakkad and Ranti movie poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 5, 2024, 2:01 PM IST

Updated : Nov 5, 2024, 4:22 PM IST

मुंबई - कोणताही सिनेमा जेव्हा घोषित होतो तेव्हा त्या चित्रपटात कोण भूमिका करतंय आणि कोणी दिग्दर्शित केला आहे या गोष्टीकडं प्रेक्षकांचं लक्ष सर्वाधिक वेधलं जातं. समित कक्कड हे नावं नाविन्यपूर्ण विषयाची खात्री देणारी कलाकृती बनवणारा दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं. आजवरच्या कलाकृतीतून समितनं सिनेप्रेमींच्या मनात स्थान मिळवलं आहे. आता तो ‘रानटी’ हा मराठीतला मोठा अ‍ॅक्शनपट घेऊन आला आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेता जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनी या चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. या टिझरला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

कोणत्याही विषयाच्या सखोल अभ्यास करुन मगच तो विषय वास्तववादी स्वरुपात पडद्यावर सादर करायचा, हे वैशिष्ट्य समितच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकल्यावर अगदी सहजपणे लक्षात येतं. दिग्दर्शक समित कक्कडच्या कलाकृतीमध्ये नेहमीच वैविध्यपूर्ण विषय पाहायला मिळाले आहेत. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, ३६ गुण अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणाऱ्या आणि सादर करण्याची क्षमता असणाऱ्या दिग्दर्शक समित कक्कड यानं आपली प्रतिभा सिद्ध करण्याचा आणि दर्जा जपण्याचा कायम प्रयत्न केला आहे.

आजवर मराठीच्या मोठ्या पडद्यावर क्वचितच दिसलेली पॉवरफुल्ल अ‍ॅक्शन ‘रानटी’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अंगावर रोमांच आणणारे स्टंटस् ‘रानटी’ या अ‍ॅक्शपटात पहायला मिळणार आहे. काही मोजके अ‍ॅक्शनपट सोडले तर अ‍ॅक्शन मसाल्यासाठी मराठी चित्रपटांचा प्रेक्षकही हिंदी चित्रपटांकडे वळत आला आहे. म्हणूनच एक नवीन प्रयोग आणि मराठी चित्रपटांच्या आशयाला अ‍ॅक्शनचा तडका देण्यासाठी आपण 'रानटी' हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट मराठीत घेऊन आल्याचं समित यांनी म्हटलंय. "यात अ‍ॅक्शन, रोमान्स, इमोशन्स आणि भरपूर ड्रामा आहे. हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक पॉवरफुल पॅकेज आहे, आणि त्यामुळं मला खात्री आहे की, प्रेक्षकांना देखील हा चित्रपट नक्की पसंत पडेल", असा विश्वास समित कक्कड यांनी व्यक्त केला.

Last Updated : Nov 5, 2024, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.