ETV Bharat / state

शरद पवार यांचे संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत, अजित पवारांबाबत म्हणाले, "बारामतीत.." - SHARAD PAWAR NEWS

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (एसपी) यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी बारामतीमध्ये नव्या नेतृत्वाची गरज असल्याचं म्हटलं. ते बारामतीत सभेत बोलत होते.

Sharad Pawar VS Ajit Pawar
शरद पवार विधानसभा निवडणूक प्रचार (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 2:13 PM IST

Updated : Nov 5, 2024, 5:01 PM IST

पुणे : राज्याचं नव्हं तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षानं युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (5 नोव्हेंबर) बारामतीत एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांनी बारामतीत आयोजित सभेत संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. ते बारामतीतील शिर्सुफळ येथील सभेत संबोधित करत होते.

बारामतीच्या जनतेनं चार वेळा मुख्यमंत्री केलं : 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी नातू, राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार युगेंद्र पवार यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. युगेंद्र पवार हे त्यांचे काका अजित पवार यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शरद पवार म्हणाले, "बारामतीच्या जनतेनं मला चार वेळा मुख्यमंत्री केलं. तुम्ही मला 1967 मध्ये निवडून दिलं. महाराष्ट्रासाठी काम करण्याआधी मी 25 वर्षे इथे काम केलंय. बारामतीच्या जनतेनं माझी कधीच निराशा केली नाही. मी अजित पवार यांच्याकडं सर्व स्थानिक अधिकार आणि सर्व निर्णय सोपविलं होते. तसंच स्थानिक स्वराज्य संस्था, साखर आणि निवडणुकांचं नियोजन सोपवलं होतं."

शरद पवार यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

किती निवडणुका लढवायच्या? : "मी लोकसभा लढवणार नाही तसंच कोणतीही निवडणूक लढवणार नाही. आत्ता किती निवडणुका लढवायच्या? आतापर्यंत 14 निवडणुका झाल्या त्यात जनतेनं मला एकदाही घरी बसवलं नाही, आता थांबायलाच हवं. नव्या पिढीनं आता पुढं यावं या सूत्रावर मी कामाला लागलोय. लोकांची सेवा आणि लोकांचं काम मी करत राहणार. गरीबांसाठी जे जे करता येईल ते करणार. हा निर्णय माझा स्वतःचा असून आत्ता आपल्याला निवडणूक नको, हे मी ठरवलं," असं शरद पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे : "अजित पवार यांनी 25 ते 30 वर्षे बारामतीत केलेल्या कामाबद्दल शंका नाही. आता, भविष्यासाठी तयारी करण्याची वेळ आहे. आम्हाला पुढील 30 वर्षे कार्य करतील, असं नेतृत्व तयार करण्याची गरज आहे. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे," असं शरद पवार म्हणाले.

कायम मोठ्या मताधिक्क्यानं निवडून दिलं : "आजपर्यंत तुम्ही माझा शब्द कधी खाली पडू दिला नाही. जनतेनं मला कायम मोठ्या मताधिक्क्यानं निवडून दिलं. त्यानंतर सुप्रियालाही मोठ्या मताधिक्क्यानं निवडून दिलं. नुकतंच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कौटुंबीक अडचण झालेली असताना देखील जनतेनं सुप्रियाला लोकसभेत पाठवलं. आत्ता तोच निर्णय तुम्ही योगेंद्र पवार यांच्याबाबातही घ्याल," असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

  1. रेल्वेतील हिंदी भाषक टीसीनं मराठी प्रवाशाकडूनच मराठीची मागणी न करण्यासाठी घेतला लिखित माफीनामा; नंतर झालं असं काही...
  2. भाजपा नेत्या हिना गावित यांनी भाजपाला ठोकला रामराम, शिवसेना नेत्यावर गद्दारीचे आरोप
  3. मुंबईतील एकूण 420 उमेदवारांमध्ये मुस्लिम अन् उत्तर भारतीय उमेदवारांची कसोटी लागणार; कोण जिंकणार?

Last Updated : Nov 5, 2024, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.