ETV Bharat / state

बुलडाण्यात रूग्णवाहिकांचे दर निश्चित; अधिकचे दर आकारल्यास होणार कारवाई - बुलडाण्यात रूग्णवाहिकांचे दर निश्चित

सर्व रूग्णवाहिका धारकांनी वाहनात नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये रूग्णाचे नाव, पत्ता, दिनांक, मोबाईल क्रमांक, आकारलेले भाडे व रूग्णासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. वाहन यांत्रिकदृष्ट्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी वाहन मालकाची आहे. भाडे दरपत्रक रूग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे, चालक व मालकास बंधनकारक आहे.

रुग्णवाहिका दर
रुग्णवाहिका दर
author img

By

Published : May 21, 2021, 3:26 AM IST

बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रूग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रूग्णवाहिका धारकांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, बुलडाणा यांच्याकडून रूग्णवाहिकांचे अधिकृत दर निश्चित करण्यात आले आहे. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा रूग्णवाहिका धारकाने जादा दर आकारल्यास तत्काळ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ईमेल आयडी mh28@mahatranscom.in वर तक्रार नोंदवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सर्व रूग्णवाहिका धारकांनी वाहनात नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये रूग्णाचे नाव, पत्ता, दिनांक, मोबाईल क्रमांक, आकारलेले भाडे व रूग्णासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. वाहन यांत्रिकदृष्ट्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी वाहन मालकाची आहे. भाडे दरपत्रक रूग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे, चालक व मालकास बंधनकारक आहे. खाली दिलेल्या भाडे दरापेक्षा जास्त दर आकरणी करणाऱ्या वाहन मालकावर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, बुलडाणा यांचे आदेशानुसार प्रस्तावीत दंडात्मक तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

असे आहे अधिकृत दर-

रूग्ण्वाहिका (चार चाकी करीता) - भाडे दर इंधन विरहीत 300 किमीपर्यंत 24 तासांकरीता (चालक व मदतनीस सहीत) 300 किमीच्या वरचे प्रति किलो मीटर दर, विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 1000 रूपये प्रति किमी 4 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 1100 रूपये प्रति किमी 5 रूपये प्रमाणे, भाडे दर 12 तास 80 किमी साठीचा एकूण दर (इंधन चालक व मदतनीस सहीत) 80 किमीच्या वरचे प्रति किमी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 1600 रूपये प्रति किमी 20 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 1700 रूपये प्रति किमी 21 रूपये प्रमाणे, भाडे दर 24 तास 120 किमी साठीचा एकूण दर (इंधन, चालक व मदतनीस सहीत) 120 किमीच्या वरचे प्रति किमी दर विना वातानुकूलीत रूग्णवाहिकेसाठी 2400 रूपये प्रति किमी 20 रूपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 2500 रूपये प्रति किमी 21 रूपये प्रमाणे रूग्ण्वाहिका आकारण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.