ETV Bharat / state

विकासकामांचे फक्त फलकच... अलमपूर गाव अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत - Alampur Village Development News

अलमपुरात आमदार आदर्श ग्राम योजनेतून आत्तापर्यंत फक्त ७ लाख रुपयांची विकास कामे झाल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. मात्र गावात कुठलेच विकास कामे न झाल्याची ओरड ग्रामस्थांकडून केली जात आहे. गावात विकासकामांच्या भूमीपूजनाच्या पाट्या लागल्या आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणचे कामे अद्याप झाले नसल्याचे गांवकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

अलमपूर गाव
author img

By

Published : Oct 15, 2019, 9:16 PM IST

Updated : Oct 16, 2019, 9:14 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षापासून भाजपची सत्ता कायम आहे. या मतदारसंघाचा विकास करण्याची धुरा भाजपने आमदार चैनसुख संचेती यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार संचेती यांनी मलकापूर मतदारसंघातील अलमपूर गावाचा विकास करण्यासाठी त्यास आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतले होते. गावाला दत्तक घेतल्यानंतर आमदार संचेती यांनी गावात नारळ फोडून विकास कामांचे भूमिपूजन देखील केले. मात्र, गावात विकास कामे झालीच नसल्याचे चित्र असून गावकऱ्यांना अजूनही विकासाची प्रतीक्षा आहे.

अलमपूर गाव अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत

अलमपुरात आमदार आदर्श ग्राम योजनेतून आत्तापर्यंत फक्त ७ लाख रुपयांची विकास कामे झाल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. मात्र गावात कुठलेच विकास कामे न झाल्याची ओरड ग्रामस्थांकडून केली जात आहे. गावात विकासकामांच्या भूमीपूजनाच्या पाट्या लागल्या आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणचे कामे अद्याप झाले नसल्याचे गांवकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेत रस्ते नाही. केवळ शेतरस्त्यांच्या खडीकरणासाठी भूमीपूजन झाले आहे. मात्र या कामात देखील प्रत्यक्षात शेत रस्त्याचे काम झाले नाही. विकास तर दूरच राहिला आमदार संचेती गेल्या ५ वर्षात अलमपूर गावात फिरकलेच नाहीत. ते केवळ निवडणुकी पुरतेच गावात येतात, असे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

गावातील सर्वात प्रमुख समस्या म्हणजे, गावाच्या मधोमध जाणारा नाला हा गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तर पावसाळ्यात या नाल्याचे सांडपाणी गावात शिरते. त्यामुळे गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना या सांडपाण्यातून आपली वाट काढावी लागत आहे. गावात मुलभूत सुविधांचा देखील अभाव आहे. बेकार रस्ते, सांडपाण्याची अव्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता, आरोग्य सुविधा, अशा अनेक समस्यांनी या गावाला ग्रासले आहे.

हेही वाचा- 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न

गावातील समस्यांबाबत अलमपूरच्या सरपंचा संगीता ज्ञानेश्वर तायडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर बोलण्यास नकार दिला आहे. अलमपूरमध्ये आमदार आदर्श ग्राम योजनेतून ३३४.९१ लाख रुपयांच्या विकास आरखड्यातून केवळ ७ लाख रुपयांचाच विकास झाल्याची शासकीय आकडेवारीत नोंद आहे. संचेती यांनी दत्तक घेतलेल्या आदर्श गावात त्यांनी कुठल्याच प्रकारचा विकास केला नाही. त्यांच्या दुर्लक्षपणामुळे आज अलमपूर गावाला विकासापासून वंचित राहावे लागत आहे.

हेही वाचा- भाजप आमदार फुंडकरांच्या आदर्श गावाची दयनीय अवस्था; आतापर्यंत 'भोपळा' विकास

Intro:Body:बुलडाणा:- ज्या मतदार संघात गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपचा गड कायम आहे ते गड म्हणजे आमदार चैनसुख संचेती यांचे मलकापूर विधानसभा मतदार संघ, या मतदार संघातील अलमपूर गावाला आदर्श करण्यासाठी आमदार संचेतींनी दत्तक घेतले मात्र याच आदर्श गावात नारळ फोडून विकास कामांचे भूमिपूजन करीत तेच 'नारळ' गावकऱ्यांच्या हाती दिल्याची ओरळ असल्याचे समोर आले आहे.गावात विकास कामांची भूमिपूजन केल्यानंतर विकास झाली नसल्याचे चित्र असून गावकऱ्यांना विकासाची प्रतिक्षा आहे. अलमपूरात आमदार आदर्श ग्राम योजनेतून आत्तापर्यंत 7 लक्ष रुपयांचा विकास झाल्याचा शासकीय दप्तरी नोंद आहे मात्र गावात कुठलेच विकास कामे न झाल्याची ओरड ग्रामस्थ करताय पाहूया आमदार संचेतींनी दत्तक घेतलेले आदर्श गांव अलमपूरचा स्पेशल रिपोर्ट..

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेतून गांव दत्तक घेवून आदर्श ग्राम करण्याच्या संकल्पेतून गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचा गड राखून ठेवलेल्या मलकापूर मतदार संघाचे आ.चैनसुख संचेतींनी आदर्श ग्राम करण्यासाठी अलमपूर हे गांव दत्तक घेतले तरी आणि त्या ठिकाणी विकासकामांचे नारळ फोडून भूमिपूजन केले आणि तेच नारळ अलमपूर गावकऱ्यांच्या हातात दिले.कारण ज्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्या भूमीपूजनच्या पाट्या तर तसेच लागले आहे मात्र प्रत्यक्षात गावात त्या ठिकाणचे कामे अद्यापर्यंत झाले नसल्याचे गांवकरी सांगताय,तर शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेतरस्ते नाही केवळ शेतरस्त्यांच्या खडीकरण साठी भूमीपूजन झालेले आहे मात्र प्रत्यक्षात शेतरस्त्याचे कामे झाली नाही एवढेच नव्हे तर आमदार संचेती हे गेल्या 5 वर्षात गावात फिरकलेच नाही ते केवळ निवडणूक पुरताच गावात येतात असल्याचे म्हणणे गावकऱ्यांचे आहे..अलमपूर गावांत सर्वात मुख्य समस्या म्हणजे गावातील मधोमधून जाणाऱ्या नाला डोकेदुखी ठरत असून गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तर पावसाळ्यात या नाल्याचा सांडपाणी गावात पसरतो आणि गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना देखील सांडपाणीतून जावे लागते,गावात मूलभूत सुविधा नसून रस्ते नाही,सांडपाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही,आरोग्याची सुविधा नाही,अश्या समस्यांनी ग्रासले आहे मलकापूर भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्या आदर्श गांव अलमपूरला सध्या ही अलमपूर हे विकासाच्या प्रतीक्षेत आहे.याबाबतीत अलमपूरच्या सरपंचा सौ. संगीता ज्ञानेश्वर तायडे ह्या बोलण्यास नकार दिला.तर अलमपूर मध्ये आमदार आदर्श ग्राम योजनेतून 334.91 लक्ष रुपयांचा विकास आरखड्यातून केवळ 7 लक्ष रुपयांचा विकास झाल्याची शासकीय आकडेवारीत नोंद आहे.आपल्याच दत्तक घेतलेल्या आदर्श गावात कुठल्याच प्रकारचा विकास न करून अलमपूर मध्ये नारळ फोडून विकासाचे भूमीपूजन करून आमदार संचेतींनी गावकऱ्यांच्या हातात 'नारळ' दिले असेल तर मलकापूर मतदार संघात त्यांनी कोणा-कोणाच्या हाती 'नारळ' दिले असेल हे त्यांनाच माहीत असावे..

बाईट:- चैनसुख संचेती, आमदार मलकापूर भाजप

बाईट मध्ये ज्यांचे त्यांचे बाईट नाव आहे ते ऐकून घ्यावे..

कृपया पैकेज करावे...

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.