ETV Bharat / state

बुलडाण्यात 9 नवीन कोरोनाबाधित; 6 रुग्णांनी केली कोरोनावर मात - Buldana

आतापर्यंत 1 हजार 914 कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 142 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 60 आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 17, 2020, 6:24 PM IST

बुलडाणा- प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नामुन्यांच्या अहवालांपैकी आज 50 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 41 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उप-जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे पारपेट, मलकापूर येथील 60 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी, 10 व 12 वर्षीय मुलगी, पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 65 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवकाचे आहेत. तसेच बाळापूर जि. अकोला येथील 52 वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल शेगाव येथे पॉझिटिव्ह आला आहे.

तसेच आज 6 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये खामगाव येथून भीमनगर, मलकापूर येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाला सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा येथून 38 वर्षीय पुरुष चैतन्यवाडी, मलकापूर, 10 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय पुरुष मलकापूर, 58 वर्षीय महिला जाधववाडी, मलकापूर व 39 वर्षीय पुरुष गाडेगाव मलकापूर येथील रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 87 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 50 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच आतापर्यंत 1 हजार 914 कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 142 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 60 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.