बुलडाणा - नांदुरा ते जळगाव जामोद रोडवरील हॉटेल शिवनेरीजवळ टाटा मॅजिक ऐआणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. आज सोमवारी (९ मार्च) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
नारायण गजानन लोळ (वय २१ वर्ष), पुरुषोत्तम महादेव जवरे (वय २३ वर्ष), असे मृतांचे नाव असून दोघेही नारायणपूर येथील रहिवासी आहे. टाटा मॅजिक वाहनामधील मो. रजिक मो रफिक (वय ४२) हे जखमी झाले असून ते गोधनापूर येथील रहिवासी आहेत. रफिक टाटा मॅजिकने नांदुराकडून जळगाव जामोदकडे जात होते. यावेळी निमगावकडून नांदुराकडे येणाऱ्या दुचाकी आणि टाटा मॅजिकमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर टाटा मॅजिकमधील रफिक जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, पत्रकार प्रवीण डवगे, पत्रकार वैभव काजळे यांच्यासह नांदुरा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शाम आघाव हे रुगणवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृत व जखमींना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.