ETV Bharat / state

Buldhana Ragging : बुलढाण्यात रॅगिंगमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; ऑडिओ क्लिपमुळे झाला खुलासा - लोणार पोलिसात तक्रार

बुलढाण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षे कैलास गायकवाड या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी लोणार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध रॅगिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मामा योगेश कोल्हे यांनी लोणार पोलिसात तक्रार दिली होती.

Buldhana crime
विद्यार्थ्याची आत्महत्या
author img

By

Published : Jan 24, 2023, 1:33 PM IST

Updated : Jan 24, 2023, 3:32 PM IST

बुलढाणा : लोणारमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या कैलास गायकवाडने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे 19 जानेवारी रोजी समोर आले होते. या प्रकरणात वस्तीगृहाचे गृहपाल यांनी कैलास वर रॅगिंग होत असताना दुर्लक्ष केले होते. तसेच आयटीआय कॉलेजचे शिक्षक यांनी मुलांसमोर कैलासला शिवीगाळ करून त्याचा मानसिक छळ केला होता. त्याने 18 जानेवारीला आत्महत्या केल्याचे योगेश कोल्हे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

ऑडिओ क्लिप व्हायरल : लोणार पोलिसांनी आयटीआयची शिक्षक डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाचे गृहपाल व रॅगिंग करणारे तीन विद्यार्थ्यांवर यांच्यावर आधिनियम 1999 च्या कलम तीन आणि चारसह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. यादरम्यान आत्महत्या करणाऱ्या कैलास गायकवाड व त्याच्या नातेवाईकांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे या प्रकरणात कैलास सोबत रॅगिंगचा प्रकार झाल्याची चर्चा लोणार परिसरात सुरू होती. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध रॅगिंगचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास लोणार पोलीस करत आहेत.

रँगिंग म्हणजे काय? : कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचत असेल किंवा पोहोचण्याची शक्यता असेल किंवा त्याच्यात धास्तीची, भयाची, लज्जेची किंवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होत असेल, असे गैरवर्तणुकीचे प्रदर्शन करणे किंवा असे कोणतेही कृत्य करणे म्हणजे रॅगिंग अशी व्याख्या कायद्यात करण्यात आली आहे.सुरुवातीला रँगिग हा प्रकार छोटय़ा गोष्टींनी सुरू झाला होता. त्यात ओळख करुन देण्याचा उद्देश होता. त्यानंतर त्याचे स्वरुप गंभीर होऊ लागले. सगळ्यांसमोर नाचायला, गायला लावणे, कोणालाही शिव्या द्यायला लावणे, मुला-मुलीला प्रपोज करणे, छेड काढणे, शिक्षकांची टिंगल किंवा खोडय़ा करायला सांगणे, काही तरी खाण्या-पिण्यास सांगणे ,अमली पदार्थाचं सेवन करण्यास सांगणे, अश्लील दृक्श्राव्य फिती पाहावयास सांगणे, अश्लील कृतीत सहभाग घ्यावयास सांगणे, शारीरिक इजा पोहोचवणे असे प्रकार सुरु झाले. त्यानंतर रँगिग रोखण्याच्या उपययोजना करण्यासाठी अनेक समित्या तयार झाल्या. त्यांनी आपले अहवाल दिले. कायदे करण्यात आले. परंतु हे प्रकार अजूनही थांबलेले नसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : Nanded Crime छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या युवकावर गुन्हा दाखल

Last Updated : Jan 24, 2023, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.