ETV Bharat / state

भंडारा जिल्हा परिषद भरती परीक्षा रद्द, परीक्षेत घोळ करणाऱ्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल - Scam in bhandara

जिल्हा परिषदेतील 3 पदाच्या भरतीसाठी जिल्हा निवड समितीच्यावतीने घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान घोळ करणाऱ्या आठ जणांविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद, भंडारा
जिल्हा परिषद, भंडारा
author img

By

Published : Jan 16, 2020, 9:45 PM IST

भंडारा - जिल्हा परिषदेतील 3 पदाच्या भरतीसाठी जिल्हा निवड समितीच्यावतीने घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान घोळ झाल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, याप्रकरणी चार उमेदवार व परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार उमेदवारांनाही पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भंडारा जिल्हा परिषदेतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील तीन जागा भरण्यासाठी जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून प्रक्रीया सुरू करण्यात आली. दोन अंगणवाडी सेविका आणि पाणी पुरवठा विभागात एक कनिष्ठ अभियंता अशा तीन जागांचा यात समावेश होता. ही संपूर्ण परीक्षेची प्रक्रिया एसएमबी प्रा.लि. नावाची कंपनी हाताळत होती. परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका मी स्वतः तयार केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अत्यंत गोपनीय पद्धतीने हे काम करण्यात आले. 200 गुणापैकी 150 च्या आसपास गुण घेवू शकतील, अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती.

गेल्या 12 जानेवारीला लेखी परीक्षा घेतली गेली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका प्रकाशित करून 13 जानेवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. अंगणवाडी सेविकेच्या प्रश्नपत्रिकेत असलेली दुरुस्ती एका उमेदवाराने लक्षात आणून दिल्यानंतर त्या प्रश्नासाठी पूर्ण गुण देण्याचाही निर्णय घेतले गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

14 जानेवारीला प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासणीअंती अंगणवाडी सेविका पदासाठी पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराने 190, दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवाराने 186 आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने 154 गुण घेतले. कनिष्ठ अभियंता पदासाठी पहिला उमेदवार 190, दुसरा 178 आणि तिसरा 142 गुणापर्यंत पोहोचला. या गुणांबाबत शंका आल्याने दोन्ही पदासाठी पहिल्या तीन क्रमांक पटकाविणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष बोलवून परीक्षेत दिलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारितच तोंडी उत्तरे विचारली गेली. मात्र, 190 गुण घेणारा उमेदवारही समाधानकारक उत्तरे देवू शकला नाही. 190 गुण घेतले असतानाही साधे इंग्रजी बोलता येत नसल्याने हा विषय गंभीर होता. याचवेळी ओएमआर पद्धतीने उत्तरपत्रिकेची तपासणी करत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण पाहिले असता त्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वेगळ्या उत्तरपत्रिका काही ठिकाणी टाकल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. तसेच परीक्षा पर्यवेक्षकाच्या स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आली. या सगळ्या प्रकारामुळे परीक्षा प्रक्रीयेदरम्यान घोळ असल्याचे लक्षात येताच अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि कनिष्ठ अभियंता अशा दोन्ही पदासाठीच्या पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या उमेदवारांवर व एसएमबी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांच्या अशा एकूण 8 जणांविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - भंडाऱ्यात पहिल्यांदाच पतंग महोत्सवाचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दरम्यान, हा घोळ पुढे आल्याने घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला असून ती पुन्हा घेतली जाणार आहे. ज्या कंपनीने हे काम केले, त्या एसएमबी कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेत असतानाच ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, अशा चार उमेदवारांना या परीक्षेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने अपात्र घोषित करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. याच कंपनीकडून लगतच्या चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यामध्येही परीक्षा प्रक्रिया हाताळली जात असल्याने तेथीलही कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आठही जणांच्या विरोधात भा.दं.वि.च्या कलम 420, 465, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षा नव्याने होणार असली तरी यापूर्वी उमेदवारी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करावे लागणार नाही, असेही सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होत्या.

हेही वाचा - ग्राम स्वच्छता पुरस्काराचे नाना पटोलेंच्या हस्ते वितरण; सोहळ्यात बहुतांश जिल्हा परिषद सदस्य गैरहजर

Intro:Anc : जिल्हा परिषदेतील तीन पदाच्या भरतीसाठी जिल्हा निवड समितीच्या वतीने घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान घोळ झाल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.जे.प्रदीपचंद्रन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान याप्रकरणी चार उमेदवार व परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या चार कर्मचार्यांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार उमेदवारांनाही पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
Body:न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भंडारा जिल्हा परिषदेतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील तीन जागा भरण्यासाठी जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून प्रक्रीया सुरू करण्यात आली. दोन अंगणवाडी सेविका आणि पाणी पुरवठा विभागात एक कनिष्ठ अभियंता अशा तीन जागांचा यात समावेश होता. ही संपुर्ण परीक्षेची प्रक्रीया एसएमबी प्रा.लि. नावाची कंपनी हाताळीत होती. परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका मी स्वतः तयार केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अत्यंत गोपनीय पध्दतीने हे काम करण्यात आले. 200 गुणापैकी 150 च्या आसपास गुण घेवू शकतील अशा क्लिष्ठ पध्दतीने ही प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती.

12 जानेवारी रोजी लेखी परीक्षा घेतली गेली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका प्रकाशित करून 13 जानेवारी पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. अंगणवाडी सेविकेच्या प्रश्नपत्रिकेत असलेली दुरूस्ती एका उमेदवाराने लक्षात आणून दिल्यानंतर त्या प्रश्नासाठी पुर्णपैकी पूर्ण गुण देण्याचाही निर्णय घेतल्या गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
14 तारखेला प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासणीअंती अंगणवाडी सेविका पदासाठी पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराने 190, दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवाराने 186 आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने 154 गुण घेतले. तर कनिष्ठ अभियंता पदासाठी पहिला उमेदवार 190, दुसरा 178 आणि तिसरा 142 गुणापर्यंत पोहचला. घेतलेले गुण शंकेस वाव देणारे असल्याने दोन्ही पदासाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष बोलवून परीक्षेत दिलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारितच तोंडी उत्तरे विचारली गेली. मात्र 190 गुण घेणारा उमेदवारही समाधानकारक उत्तरे देवू शकला नाही. 190 गुण घेतले असतानाही साधे इंग्लिश बोलता येऊ नये, हा विषय गंभीर होता. याचवेळी ओएमआर पध्दतीने उत्तरपत्रिकेची तपासणी करीत असल्याचे व्हिडीओ चित्रीकरण पाहिले असता त्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वेगळ्या उत्तरपत्रिका काही ठिकाणी टाकल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. परीक्षा पर्यवेक्षकाच्या स्वाक्षऱ्या मध्ये तफावत आढळून आली. या सगळ्या प्रकारामुळे परीक्षा प्रक्रीयेदरम्यान घोळ असल्याचे लक्षात येताच अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि कनिष्ठ अभियंता अशा दोन्ही पदासाठीच्या पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या उमेदवारांवर व एसएमबी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांच्या अशा एकूण 8 जणांवर भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान हा घोळ पुढे आल्याने घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला असून ती पुन्हा घेतली जाणार आहे. ज्या कंपनीने हे काम केले, त्या एसएमबी कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेत असतानाच ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, अशा चार उमेदवारांना या परीक्षेसाठी सहभागी होण्याच्या दृष्टीने अपात्र घोषित करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. याच कंपनीकडून लगतच्या चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यामध्येही परीक्षा प्रक्रीया हाताळली जात आहे, हे विशेष! आठही जणांच्या विरोधात कलम 420, 465, 468, 471, 34 भादंविच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षा नव्याने होणार असली तरी यापुर्वी उमेदवारी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करावे लागणार नाही, असेही सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ सुभाष पवार, उपमुख्य कार्यपालन अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होत्या.
बाईट : सुभाष पवार, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, भंडाराConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.