ETV Bharat / state

भंडाऱ्यात वाळू तस्करीने घेतला एकाचा बळी; जेसीबीचा पंजा लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

नवनीत संजय सिंदपुरे (वय 16) असे मृत मुलाचे नाव असून तो आपल्या आईचा एकमेव आधार होता. त्यानंतर वाळू माफियावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

वाळू तस्करीने घेतला एकुलत्या एक मुलाचा बळी
author img

By

Published : May 18, 2019, 4:39 PM IST

भंडारा - अवैध वाळू तस्करीने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. रात्री वाळू उपसा सुरू असताना तरुणाच्या डोक्याला जेसीबीचा पंजा लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. नवनीत संजय सिंदपुरे (वय 16) असे मृत मुलाचे नाव असून तो आपल्या आईचा एकमेव आधार होता. त्यानंतर वाळू माफियावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

मोहाडी तालुक्यातील रोहा गावातील रहिवासी नवनीत सिंदपुरे, हा त्याचा मित्र ट्रॅक्टर चालक चेतन उके याच्यासह फिरायला जात आहे, असे आईला सांगून रात्री 9 वाजेच्या दरम्यान घरातून निघून गेला, तो परत आलाच नाही. रात्रभर मुलगा घरी न आल्याने आईने सकाळी चेतनचे घर गाठले तेव्हा चेतन घरीच होता, नवनीतच्या आईने त्याला नवनीतविषयी विचारले असता सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तर देत, तो नदीवरच झोपला असल्याचे सांगितले. नंतर मात्र नवनीतला जेसीबीचा पंजा डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले.

घटनेची माहिती संपूर्ण गावात पसरताच गावकरी घटनास्थळावर पोहचले, तेव्हा नवनीतच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त गेले होते. नवनीतचा मृतदेह पाहताच त्याच्या आईने हंबरडा फोडला. त्यानंतर पोलीसही घटनास्थळावर पोहचले असून घटनास्थळाचा पंचनामा करत उत्तरनिहाय तपासणीसाठी शव मोहाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

नवनीतला वडील नाहीत. तो आईला एकटा मुलगा होता. त्याच्या जाण्याने नवनीतची आई एकटी पडली आहे. रोहा येथील वाळू घाट बंद असूनही येथे रात्रीला वाळूचा अवैध उपसा होतोच कसा? या वाळू माफियांना कोणाचे पाठबळ आहे? त्या वाळू माफियावर, जेसीबी चालकांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी केली आहे.

Intro:Body:ANC : अवैध वाळू तस्करीने एका तरुणाला आपले जीव गमवावे लागले. रात्री ला वाळू उपसा सुरू असतांना तरुणांच्या डोक्याला जेसीबीच्या पंजा लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून नवनीत संजय सिंदपुरे वय 16 वर्ष असे मृत मुलाचे नाव असून तो आपल्या आईचा एकमेव आधार होता. त्या वाळू माफियावर कार्यवाहीची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
मोहाडी तालुक्यातील रोहा गावातील राहवासी नवनीत सिंदपुरे हा त्याच्या मित्र ट्रॅक्टर चालक चेतन उके याच्यासह फिरायला जात आहे असे आईला सांगून रात्री 9 वाजेच्या दरम्यान घरून निघून गेला तो आलाच नाही. रात्रभर मुलगा घरी न आल्याने आईने सकाळी चेतन चा घर गाठलं तेव्हा चेतन घरीच होता, नवनीत च्या आई ने तुला नवनीत विषयी विचारले असता सुरवातीला उडवाउडवीची उत्तर देत, तो नदीवरच झोपला असल्याचे स सांगितले नंतर मात्र नवनीतला जेसिबी चा पंजा डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले, घटनेची माहिती संपूर्ण गावात पसरताच गावकरी घटना स्थळावर पोहचले, तेव्हा नवनीतच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याच्या डोक्यातुन मोठ्या प्रमाणात रक्त गेला होता, नवनीत चा मृतदेह पाहताच त्याचा आईने हंबरडा फोडला, पोलीस ही घटना स्थळावर पोहचले घटना स्थळाचा पंचनामा करीत उत्तरनिय तपासणीसाठी शव मोहाडी रुग्णालयात पाठविण्यात आले.
नवनीतला वडील नाहीत तो आई ला एकटा मुलगा होता त्याच्या जाण्याने नवनीत ची आई एकटी पडली आहे,
रोहा येथील वाळू घाट बंद असूनही इथे रात्री ला वाळू चा अवैध उपसा होतच कसा या वाळू माफियांना कोणाचा पाठबळ आहे, त्या वाळू माफियावर, जेसीबी चालकांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हाही अशी मागणी परिवाराने आणि गावकऱ्यांनी केली आहे.
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.