भंडारा- केंद्र सरकारने सोमवारपासून दारू दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, जिल्ह्यात दुकाने सुरू करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. भंडाऱ्यात दारू दुकाने सुरू होणार नाहीत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तळीरामांची हिरमोड झाली आहे.
हेही वाचा- कोरोनाग्रस्त मृतदेहांवर नातेवाईकांच्या अनुपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
दारू दुकान सुरू होणार म्हणून सोमवारी दारू दुकानदारांनी सर्व तयारी करुन ठेवली होती. दुकानासमोर सोशल डिस्टन्सचे रखाने आखले होते. तळीरामही सकाळ पासून दुकाने उघडण्याची वाट पाहत होते. मात्र, दुपारी एक वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून दुकाने उघडणार नाहीत, असे सांगून तळीरामांना धक्काच दिली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील दारूचे दुकान बंदच राहणार आहेत. हे माहीत होताच तळीरामांमध्ये घोर निराशा झाली. दारू दुकाने सुरू होतील हे माहिती झाल्यापासून त्यांनी रंगविलेल्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा झाला. जिल्ह्यात दारू वळगता आणि कंटेन्मेंट परिसर सोडून इतर ठिकानातील सर्व दुकाने, उद्दोग सुरू झाले आहेत. पण यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.