ETV Bharat / state

अल्पभूधारक विधवा महिला शेतकऱ्याचे 'या' मागणीसाठी शेतातच 'आमरण उपोषण' - woman goes on hunger strike in farm field

सात महिन्यांपूर्वी रस्ता बनवणाऱ्या कंपनीने ताराबाई मेश्राम यांच्या शेतात जेसीबीच्या साह्याने मुरूम उत्खनन सुरू केले. ताराबाई यांनी विरोध केल्यावर कंपनीने तहसीलदार यांनी खोदकामाची परवानगी दिली असून या खोदकामानंतर शेतीत मातीचा भरणा टाकून त्यावर शेणखत टाकून देऊ, असे आश्वासन दिले होते.

Widow woman goes on hunger strike in bhandara
शेतजमीनीत बेकायदा उत्खनन केल्यामुळे नुकसान भरपाईसाठी महिलेचे शेतात उपोषण
author img

By

Published : Jul 13, 2020, 8:39 PM IST

भंडारा - जिल्ह्यातील दवडीपार गावातील एक अल्पभूधारक विधवा महिला शेतकरी तिच्या शेतातच आमरण उपोषणाला बसली आहे. तिच्या तीन एकर शेतातील मुरूम रस्ते निर्मिती कंपनीने कोणतीही परवानगी न घेता खोदकाम केल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले असल्याचे महिलेने म्हटले आहे. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस स्टेशनच्या तिने चकरा मारल्या. मात्र, कोणीही तिच्या तक्रारीला दाद दिली नसल्याने शेवटी या महिलेने सोमवारपासून तिच्याच शेतात पावसाच्या दिवसात आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे.

शेतजमीनीत बेकायदा उत्खनन केल्यामुळे नुकसान भरपाईसाठी महिलेचे शेतात उपोषण

भंडारा तालुक्यातील दवडीपार गावात राहणारी ताराबाई मेश्राम, असे या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. ताराबाईच्या पतीचा 25 वर्षा पूर्वी मृत्यू झाला होता. मोलमजुरी करून आणि शेती करून तिने तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवला होते. त्यातूनच तीन मुलींना शिकवून त्यांचे लग्न लावून दिले होते. आता सध्या ती आणि तिचा तरुण मुलगा असून तो मुलगा भात गिरणी कारखान्यात हमालीचे काम करतो.

हेही वाचा - संवाद हवा..! महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्ष चालेल, पुढच्या निवडणुकाही एकत्रच लढू

दवडीपार गावात त्यांची तीन एकर शेती आहे. ही वडिलोपार्जित शेती असल्याने या शेतीमध्ये सहा लोकांचे हिस्से आहेत. म्हणजे ताराबाई यांच्या हिस्स्यात फक्त अर्धा एकर शेती आहे. मात्र, कुटुंबातील इतर मंडळी ही शेती करत नसून ताराबाई शेतीची वहीवाट करते.

मागील दोन वर्षांपासून भंडारा ते पवनी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम 'गवार' या कंपनीतर्फे केला जात आहे. रस्ते निर्मितीसाठी लागणारा मुरुम ही कंपनी मिळेल, त्या ठिकाणाहून उत्खनन करत आहे. सात महिने अगोदर रस्ता बनवणाऱ्या या कंपनीने ताराबाई मेश्राम यांच्या शेतात जेसीबीच्या साह्याने मुरूम उत्खनन सुरू केले. ताराबाई यांनी विरोध केल्यावर कंपनीने तहसीलदार यांनी खोदकामाची परवानगी दिली असून या खोदकामानंतर शेतीत मातीचा भरणा टाकून त्यावर शेणखत टाकून देऊ, असे आश्वासन दिले होते.

हेही वाचा - पश्चिम बंगालमधील भाजप आमदार देबेंद्र राय यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला

भंडारा तहसीलदार पोयाम यांनी महिलेची परवानगी न घेता कंपनीला एक हजार ब्रास मुरूम खोदण्याची परवानगी दिली. त्यासाठी त्यांनी दोन टप्प्यात एकाच दिवशीची परवानगी दिली कारण त्यांना 500 पेक्षा जास्त परवानगी देता येत नाही. त्यामुळे त्यांनी हा मार्ग शोधला. तहसीलदारांनी एक हजार ब्रास ची परवानगी दिली असली, तरी कंपनीने मात्र जवळपास सात हजार ब्रास मुरमाचा खोदकाम केला. त्यामुळे ताराबाई मेश्राम यांच्या शेताला एकंदरीत तळ्याचे स्वरूप निर्माण झाले.

ताराबाई यांनी याविषयी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस विभाग यात सर्वच ठिकाणी तक्रारी केल्या. मात्र, प्रत्येक ठिकाणाहून त्यांच्या हाती केवळ निराशा मिळाली. शेवटी त्यांनी सोमवारपासून आपल्याच शेतात आमरण उपोषणाचा हत्यार उगारलेला आहे. याविषयी तहसीलदार यांना विचारणी करण्यासाठी गेले असता तहसीलदार उपलब्ध नव्हते. तसेच त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केली असता, त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना या विषयी विचारले असता त्यांनी, सुरुवातीला प्रकरण कोणते हेच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रकरणाची माहीती घेऊन न्याय मिळवून देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु, दवडीपार असे गावाचा नाव घेताच एका महिलेवर उपोषण करण्याची वेळ येत आहे, हे वाईट आहे. लवकरच तिच्या समस्येचा निराकार करण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.