ETV Bharat / state

भंडाऱ्यातील उड्डाण पूलाला खड्डे, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

जिल्ह्यातून गेलेल्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरून दररोज शंभरच्यावर रेल्वे गाड्या या मार्गावरून जात असतात. त्यामुळे तुमसर ते गोंदिया या महामार्गावर वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होत असे, त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी या ठिकाणी 40 कोटी रुपये खर्च करून उड्डान पूल बनविण्यात येत आहे. मागील पाच वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. मात्र, या उड्डान पुलामध्ये अदानी पावर प्लांटची राख टाकण्यात आली आहे

भंडाऱ्यातील तुमसर-तिरोडा पूलाला पडलेले खड्डे
author img

By

Published : Sep 14, 2019, 8:20 AM IST

Updated : Sep 14, 2019, 9:39 AM IST

भंडारा - जिल्ह्यातील तुमसर ते तिरोडा मार्गावर देव्हाडी येथे सुरू असलेल्या उड्डान पुलाचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. या पुलामध्ये भर घालण्यासाठी मध्यभागी राखेचा वापर केला आहे. मात्र, आता पावसामुळे ही राख वाहून जात असल्याने पुलावर 5 ते 10 फुटांचे खोल खड्डे सतत पडत आहेत. अद्याप या पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही, तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. वाहतूक सुरू झाल्यास इथे मोठी घटना होण्याची शक्यता आहे. म्हणून योग्य पद्धतीने पुलाचे काम करावे तसेच कंत्राटदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

भंडाऱ्यातील उड्डाण पूलाला खड्डे, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

हेही वाचा - सदाभाऊ खोतांची महायुतीकडे 12 जागांची मागणी; 'हे' आहेत मतदारसंघ

जिल्ह्यातून गेलेल्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरून दररोज शंभरच्यावर रेल्वे गाड्या या मार्गावरून जात असतात. त्यामुळे तुमसर ते गोंदिया या महामार्गावर वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होत असे, त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी या ठिकाणी 40 कोटी रुपये खर्च करून उड्डान पूल बनविण्यात येत आहे. मागील पाच वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. मात्र, या उड्डान पुलामध्ये अदानी पावर प्लांटची राख टाकण्यात आली आहे. पावसाळा लागताच पुलाच्या दगडांच्या गॅपमधून राख वाहून जात असल्याने पूलामध्ये पोकळी निर्माण झाली आणि त्यामुळे पुलावर 10 फुटापर्यंत खड्डे पडणे सुरू आहे. खड्डा पडला की त्यामध्ये सिमेंट काँक्रीट भरून खड्डे बुजविण्याचे प्रकार आता नेहमीच पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - ११८ मुलींना परिवहन विभागात सामील करून घेणार - दिवाकर रावते

या प्रकारामुळे पुलाच्या बांधकामावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संबंधित अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आल्याने खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र, कंत्राटदारावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. भविष्यात पूल तयार होऊन पुलावरून जड वाहन गेल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तर हा उड्डान पूल तयार करताना तांत्रिकी दृष्ट्या अधिकाऱ्यांनी योग्य पाहणी का केली नाही, असा प्रश्न निर्माण झाला
आहे.

हेही वाचा - स्वामी चिन्मयानंद यांच्या दिव्य धाम आश्रमाला टाळे !

तर या विषयी संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आमदार चरण वाघमारे यांना विचारणा केली असून त्यांनी सांगितले, पुलाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. मात्र, हा पूल तयार करताना तांत्रिक बाबी लक्षात न घेता जर काम करण्यात आले असेल तर याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे. मात्र हा पूल तयार होऊनही एखादी मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण, असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.

Intro:Anc :- तुमसर ते तिरोडा मार्गावर देव्हाडी येथे सुरू असलेल्या उडान पुलाचे काम मागील पाच वर्षांपासून सुरु असून या पुलाच्या भरण म्हणून मध्यभागी राखेचा वापर केला आहे, मात्र आता पाऊसामुळे हि राख वाहून जात असल्याने पुलाच्या वर 5 ते 10 फुटांचे खड्डे सतत पडत आहेत, या पुलावरून अजूनतरी वाहतूक सुरू झाले नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत, वाहतूक सुरू झाल्यास इथे मोठी घटना होण्याची शक्यता असल्याने पुलाचे काम योग्य करावे आणि चौकशी करून कंत्राद्दारवर योग्य कारवाही ची मागणी नागरिक करीत आहेत.Body:VO :- भंडारा जिल्ह्यातून मुंबई हावडा रेल्वे मार्ग जात असून दररोज शंभरच्या वर रेल्वे गाड्या या मार्गावरून जात असतात त्यामुळे तुमसर ते गोंदिया या महा मार्गावर वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होत असे त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आता या ठिकाणि 40 कोटी रुपये खर्च करून उडान पूल बनविण्यात येत असून मागील पाच वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे, पण या उडान पुलामध्ये अदानी पावर प्लांटची राख टाकण्यात आली आहे, पावसाळा लागताच पुलंच्या दगडांच्या गॅप मधून राख वाहून जात असल्याने पूल मध्ये पोकळी निर्मना होते त्यामुळे पुलावर 10 फुटापर्यंत खड्डे सतत पडणे सुरू आहे, खड्डा पडला की त्यामध्ये सिमेंट काँक्रीट भरून खड्डे बीजविण्याचे प्रकार नेहमी पाहायला मिळत आहेत त्यामुळे याच्या बांधकामावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, या संबंधित अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आल्याने खड्डे बुजविण्याचे काम सुरु असून कंत्राटदारावर कुठलीही कारवाही करण्यात आली नाही, भविष्यात पूल तयार होऊन पुलावरून जड वाहन गेल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, पण हा उडान पूल तयार करताना तांत्रिकी दृष्ट्या अधिकाऱ्यांनी योग्य पाहणी का केली नाही अशा प्रश्न निर्माण झाला असून दोषींवर कारवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तर या विषयी संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने सत्ताधारी आमदार चरण वाघमारे याना विचारणा केली असून त्यांनी सांगितले कि पुलाचा काम अजूनही पूर्ण झाला नाही पण हा पूल तयार करताना तांत्रिक बाबी लक्षात न घेता जर काम करण्यात आला असेल तर याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर नक्कीच कारवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे, पण हा पूल तयार होऊन जर मोठी घटना झाली तर याला जवाबदार कोण अशा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे,

BYTE - चरण वाघमारे, आमदार तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र
BYTE - सुधाम गिरेपुंजे, स्थानिक नागरिक
Conclusion:
Last Updated : Sep 14, 2019, 9:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.