ETV Bharat / state

आई-बापाविना पोरक्या झालेल्या मुलांसाठी व्हा‌ॅट्सअप ग्रुपची 25 हजारांची मदत

घनश्याम कापगते यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीला दुःख अनावर झाले. त्यानंतर अवघ्या काही तासातच पत्नीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना एक पाच वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी आहे. ते आई-वडिलांवीना पोरकी झाली आहेत.

भंडाऱ्यात मुलांसाठी व्हा‌ॅट्सअप ग्रुपने केली 25 हजार रुपयांची मदत
author img

By

Published : Nov 15, 2019, 11:09 PM IST

भंडारा - पतीच्या मृत्यूचे दुःख अनावर झाल्याने पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांची दोन चिमुकली आई-वडिलांशिवाय पोरकी झाली आहेत. साकोली तालुक्याच्या वडद या गावात ही घटना घडली आहे. या दोन चिमुकल्यांकरिता एका व्हा‌ॅट्सअप ग्रुपने 25 हजारांची आर्थिक मदत देऊन माणुसकीचा परिचय दिला आहे.

भंडाऱ्यात मुलांसाठी व्हा‌ॅट्सअप ग्रुपने केली 25 हजार रुपयांची मदत

हेही वाचा- 'या' खनिजाचा राजस्थानात आढळला प्रचंड साठा; आयातीऐवजी भारत भविष्यात करणार निर्यात

घनश्याम कापगते यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीला दुःख अनावर झाले. त्यानंतर अवघ्या काही तासातच पत्नीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना एक पाच वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी आहे. त्यांचा संभाळ आजीने करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या आजीचे वय झालेले आहे. त्यामुळे ती काम करून या मुलांचा सांभाळ करू शकत नाही.

त्यामुळे सामाजिक भान जपत सानगडी येथील तरुण वर्ग समोर आला आहे. त्यांनी या दोन चिमुकल्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सहानगड ग्रुपच्या माध्यमातून या मुलांसाठी 25 हजारांची रक्कम त्यांना जमा केली आहे.

Intro:Anc : - पतीचा हृदय विकाराने अचानक मृत्यू झाल्यानंतर , पत्निला देखील हे दुःख अनावर होऊन , अवघ्या काही तासात तिचा देखील दुदैवी मृत्यू झाला व दोन चिमुकले आई वडिलांशिवाय पोरके झाले ही घटना आहे साकोली तालुक्याच्या वडद या गावातील.विशेष म्हणजे आईवडिलांचे छत्र हरविलेल्या दोघा चिमुकल्याकरिता एका व्हाट्सअप्प ग्रुप ने 25 हजार एकत्रित करीत आर्थिक मदतीचा हात पुढे करीत माणुसकीचा परिचय दिला आहे.

Body: गेल्या ८ वर्ष अगोदर , अग्नीला साक्षी मानत घनश्याम व व देवांगना कापगते विवाह बंधनात अडकले जन्मोजन्मी साथ देण्याचा आणाभाका घेतल्या , तर संसारवेलीत दोन गोंडस फुल देखील उमलली सुखाचा संसार सुरु असताना पती घनश्याम कापगते याना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला , पतीचा मृत्यू झाले असल्याचे कळताच पत्नीला दुःख अनावर झाले आणि अवघ्या काही तासातच तिचाही हृदयविकाराने दुदैवी मृत्यू झाला यात दोन चिमुकले मात्र आई वडिलांचा मायेला कायमचे पोरके झाले , साकोली तालुक्यातील वडद या गावातील हि घटना २३ ऑक्टोंबर रोजी घडली घडलेल्या घटनेमुळे अनेकांचे अश्रू अनावर झाले , शेवटी या दोन चिमुकल्याचा काय होणार त्याचे भविष्य काय असा प्रश्न ग्रामस्थ व कापगते आप्तेष्टाना पडला शेवटी हि एक पाच वर्षाचा मुलगा आदित्य व अडीच वर्षाची मुलगी जागृती यांना तिचा आजीने आपल्याकडे सांभाळा करण्याचा निर्णय घेतला तिने उतार वयात घेतला , घडलेल्या घटनेमुळे समस्त गावकरी निशब्द झाले असताना त्यांचा मदतीसाठी जवळच असलेल्या सानगडी येथील तरुण वर्ग समोर आला त्यांनी या दोन चिमुकल्यांना समाज माध्यमाचा माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेतला त्यांनी तयार केलेल्या सहानगड ग्रुप चा माध्यमातून घडलेल्या घटनेचा विस्तार मांडला व ग्रुप सदस्यांना मदतीचे आव्हाहन केले तर ग्रुप व्यतिरिक्त इतर समाज माध्यमावर हि बाब पोहचल्यामुळे आज या दोन चिमुकल्याकरिता अनेकांची मदतीचे हात समोर येऊन त्यांना विविध प्रकारे मदत मिळत आहे

आज सहानगड समाज माध्यमाने सामाजिक बांधिलकी जपत या दोन चिमुकल्यांचे मदत मिळवून देण्याकरिता हा ग्रुप प्रयत्नशील असून मिळेल तितकी मदत ते त्यांना करीत आहे , त्यामुळे आज समाज माध्यम हे केवळ बातम्या किंवा इतर गोष्टी करिता नसून या माध्यमातून गरजूना मदत देखील होऊ शकेल याचे हे ज्वलंत उदाहरण मानहावे लागेल.
बाईट : निर्मला कापगते, आजी
राजेश लीचडे, ग्रुप सदस्य, सानगडीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.